केळोशी बुद्रुक येथ प्रकल्पावर प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

केळोशी बुद्रुक येथ प्रकल्पावर प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

01081

केळोशी बुद्रुक ः येथील लोंढा नाला प्रकल्पावर विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केले.
...

केळोशी बुद्रुक येथील लोंढा नाला
प्रकल्पावर प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

मुख्य दरवाजातून पाणी नदीपात्रात सोडलेः दहा दिवसांत मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन

धामोड, ता.२१ : केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी ) येथील लोंढा नाला प्रकल्पावर विविध मागण्यांसाठी आज प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केले . मागण्यांची पूर्तता न झाल्याने प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पाच्या मुख्य दरवाजातून पाणी नदीपात्रात सोडले. दरम्यान, शासकीय अधिकारी व प्रकल्पग्रस्तांमध्ये झालेल्या बैठकीत दहा दिवसांत मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देण्यात आले .
येथील प्रकल्पग्रस्तांनी संकलन यादी पूर्ण करणे, लाभक्षेत्रीय शेतीयोग्य मुलकीपड जमीन उपलब्ध करून देणे ,संपादीत जमिनीचे भू-भाडे मिळणे आणि पाणी परवाना याबाबत शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने प्रकल्पग्रस्तांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज प्रकल्पावर आंदोलन करुन प्रकल्पाच्या मुख्य दरवाजातून नदीपात्रात पाणी सोडले. दरम्यान, याबाबत ‘पुनर्वसन’ चे अधिकारी शिंदे , स्थापत्य अभियंता निलेश कोळी, उपविभागीय अभियंता यु. आर. स्वामी , तुळशी पाटबंधारे शाखा अभियंता खंडेराव गाडे व प्रकल्पग्रस्त एस. टी. पाटील, एकनाथ पाटील, मारुती चौगुले, केशव पाटील, शंकर चौगुले यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा झाली. प्रकल्पग्रस्त मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलनावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे अधिकारी व प्रकल्पग्रस्त यांच्यातील बैठक निष्फळ ठरली. आंदोलनस्थळी राधानगरी पोलिसांचा मोठा फौजफाटा होता.
...

‘ प्रकल्पग्रस्तांबरोबर चर्चा झाली असून दहा दिवसात संकलन यादी पूर्ण करण्याचे मान्य केले आहे. वरिष्ठ कार्यालयाकडे प्रकल्पग्रस्तांचे निवेदने पाठवले असून याबाबत लवकरच योग्य निर्णय होईल.

रामचंद्र शिंदे, पुनर्वसन विभाग
...


‘अधिकाऱ्यांना निवेदन देऊन देखील मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी पाणी थेट नदीपात्रात सोडले असून दहा दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.

एस. टी. पाटील, प्रकल्पग्रस्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com