मजलेकर यांच्या निवृत्तीनिमित्त सत्कार, गौरव विशेषांकाचे प्रकाशन

मजलेकर यांच्या निवृत्तीनिमित्त सत्कार, गौरव विशेषांकाचे प्रकाशन

00773
दानोळी ः येथे अरविंद मजलेकर यांना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व मान्यवराच्या उपस्थितीत सन्मानपत्र दिले.
----
मजलेकर यांच्या निवृत्तीनिमित्त
सत्कार, गौरव विशेषांकाचे प्रकाशन
दानोळी, ता. २९ ः शैक्षणिक क्षेत्रातून ३५ वर्षे काम करुन आपला ठसा उमटवलेले मजलेकर गुरुजी शिक्षण क्षेत्रातून निवृत्त असले तरी सहकार, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्र त्यांना खुणावत आहे. निवृत्तीनंतर या क्षेत्रात त्यांनी आणखी भरीव कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
दानोळी येथे कुमार विद्या मंदिर क्रमांक २ शाळेचे मुख्याध्यापक अरविंद मजलेकर यांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित सदिच्छा सत्कार व सेवा गौरव विशेषांकाचे प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केडीसीसी बँक संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर होते.
श्री. मजलेकर यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार यड्रावकर यांच्या हस्ते सपत्नीक सन्मान केला. मानपत्र दिले. मानपत्राचे वाचन महेश घोटणे यांनी केले.
मजलेकर यांचे गुरू, पहिले मुख्याध्यापक यांचा आमदार यड्रावकर यांच्याहस्ते सत्कार केला. बेस्ट स्टुडंट अवॉर्ड १००० रुपये रोख व सन्मानपत्र देण्याची घोषणा केली. मृणाल गावडे, राजवर्धन चव्हाण हे यावर्षीचे मानकरी ठरले. लेखापरीक्षक महेश धर्माधिकारी, सुनिल एडके, राजू जुगळे, रविकुमार पाटील, डी. ए. पाटील, निर्मला कोळी, राजगोंडा पाटील, एम.के. चव्हाण, एम.ए. यादव, भारती कोळी यांनी मनोगत व्यक्त केले.
गटविकास अधिकारी शंकरराव कवितके, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, कर्मवीर मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन सुकुमार पाटील, वीर सेवा दलाचे चेअरमन बाळासाहेब पाटील, चिपरीच्या सरपंच निर्मला कोळी आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक विजय भोसले यांनी केले. सूत्रसंचालन महेश घोटणे, किरण पाटील, सुरेखा कुंभार यांनी केले. आभार सुरेश पाटील यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com