चिंचवाड येथे सव्वा कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील यांची उपस्थिती

चिंचवाड येथे सव्वा कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील यांची उपस्थिती
Published on

03124
चिंचवाड परिसराच्या
विकासाला निधी देऊ

सतेज पाटील; विकासकामांचे उद्घाटन, प्रारंभ

गांधीनगर, ता. २७ : ‘‘आमदार ऋतुराज पाटील दक्षिण मतदारसंघात विकासाचा रथ जोमाने पुढे नेत आहेत. चिंचवाड परिसराच्या विकासासाठी ते भरीव निधी देतील,’’ असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. १ कोटी १२ लाख ८९ हजारांच्या निधीतून चिंचवाड (ता. करवीर) येथे कामांचे उद्घाटन आणि प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चेन्नईचे आमदार, काँग्रेसचे कोल्हापूर लोकसभा निरीक्षक आमदार हसन मोलाना आणि आमदार ऋतुराज पाटील यांची उपस्थिती होती.
येथे वीस लाखांतून कोळी समाज वसाहतीत काँक्रीट रस्त्यांचा प्रारंभ, मुस्लिम दफनभूमीत पंधरा लाखांतून बांधलेल्या निवारा शेडचे लोकार्पण, डॉ. आंबेडकर नगरात काँक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक कामाचे उद्घाटन, चर्मकार समाजाच्या सभागृहाचे लोकार्पण, आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती, मराठी शाळेत डिजिटल बोर्ड अशा एक कोटी तेरा लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि प्रारंभ आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले.
हसन मोलाना म्हणाले, ‘‘तमिळनाडूत डिजिटल क्लासरूम नाही. आमदार पाटील यांनी आधुनिक सुविधा उभारल्या’’ आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘भविष्यात दक्षिणमधील सर्व शाळांत डिजिटल बोर्ड लावण्याचा प्रयत्न करू. सार्वजनिक हॉलसाठी २० लाख, कचरा उठावासाठी ट्रॅक्टरची सोय करू.’ आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, ‘बाराशे नळ कनेक्शनसाठी २३ लाख निधी दिला. डिजिटल बोर्डची व्यवस्था केली.’ याप्रसंगी सरपंच श्रद्धा पोतदार, दीपक मगदूम, रामचंद्र नांद्रे गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गोकुळचे संचालक बाबासो चौगुले, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वंदना पाटील, शोभा राजमाने, उचगाव सरपंच मधुकर चव्हाण, गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे, चिंचवड उपसरपंच धन्यकुमार पाटील, माजी नगरसेवक तौफीक मुल्लाणी, आनंदा बनकर, प्रदीप झांबरे, सचिन जाधव , सचिन जाधवसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com