सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीला पाच लाखाचे बक्षीस

सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीला पाच लाखाचे बक्षीस

08007
वठार तर्फ वडगाव : जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे नूतन लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान सोहळ्यात बोलताना आमदार डॉ. विनय कोरे. शेजारी दलितमित्र अशोकराव माने, प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी.
------
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीला पाच लाखांचे बक्षीस
डॉ. विनय कोरे : जनसुराज्य शक्तीतर्फे सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार
घुणकी, ता. ३ : नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी प्रत्येक कुटुंबाचा अभ्यास करून रोजगार, उद्योग देण्यासाठी प्रयत्न करावा. जनसुराज्य शक्तीतर्फे तीन वर्षात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीला पाच लाख रुपये बक्षीस देणार असल्याची घोषणा जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी वठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथे केली. या स्पर्धेत ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कोरे यांनी केले.
जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे हातकणंगले तालुक्यातील नूतन लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान सोहळ्यात आमदार डॉ. कोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी दलितमित्र अशोकराव माने होते. व्यासपीठावर जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी उपस्थित होते.
केडीसीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने यांनी स्वागत केले. जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा नीता माने यांची भाषणे झाली. निलेवाडी, नवे पारगाव, जुने पारगाव, तळसंदे, चावरे, घुणकी, अंबप, अंबपवाडी, कासारवाडी, रुकडी, अतिग्रे, हेर्ले, सावर्डे, चोकाक, तळंदगे, टोप, संभापूर, हिंगणगाव, भादोले, वडगाव, यळगूड, माले, रांगोळी, कापूरवाडी, नरंदे, सावर्डे, नागाव, पट्टणकोडोली, इंगळी, आळते, रेंदाळ, मजले, शिरोली पुलाची, भेंडवडे, माणगाव, तासगाव, पाडळी, मनपाडळे, खोची, कुंभोज, किणी, वाठार, साजणी येथील लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार डॉ. कोरे यांच्याहस्ते झाला.
जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा माने, पुष्पाताई आळतेकर, पंचायत समितीचे माजी सभापती प्रदिप पाटील, माजी उपसभापती सुलोचना देशमुख, वडगावचे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील आदी उपस्थित होते. महेश लोळगे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com