डीवायपीकडून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ

डीवायपीकडून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ

08330
तळसंदे : डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे स्नेहसंमेलनामध्ये विजेत्यांना पारितोषिक वितरणप्रसंगी डॉ. सतीश पावसकर. प्राचार्य डॉ. दुधगीकर, प्रकाश भागाजे, आर. एस. पवार आदी.
---
डीवायपीकडून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ
डॉ. सतिश पावसकर; तळसंदे येथे पारितोषिक वितरण, स्नेहसंमेलन
घुणकी, ता. २० : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम टेक्निकल कॅम्पस नेहमी करत असते, असे मत डी. वाय‌. पाटील टेक्नीकल कॅम्पस डायरेक्टर डॉ. सतिश पावसकर यांनी तळसंदे येथे व्यक्त केले.
तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन तरुणाईच्या जल्लोषात झाले. यावेळी ते बोलत होते. डॉ. पावसकर यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. ‘इनथुझिया २के२३’ चे संयोजक प्रा. केदार रेडकर यांच्याहस्ते स्नेहसंमेलनाचा प्रारंभ झाला. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये व टेक्निकल स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवले. त्यांनतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनात्मक कार्यक्रम सादर केले.
डी. वाय. पाटील आर्किटेक्टचर कॉलेजचे प्राचार्य डॉ. दुधगिकर, रजिस्ट्रार प्रकाश भागाजे, डीन अकॅडेमिक आर. एस. पवार उपस्थित होते. संयोजन प्रा. केदार रेडकर, प्रा. एम. एस. बिजली, प्रा. शेख यांनी केले. सूत्रसंचालन सुरज निकम, तेजस पाटील यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com