जन्मानंतर ही आपल्या आपत्यावर विविध संस्कार करणे गरजेचे--परमपूज्य भट्टारक पट्टाचार्य महास्वामी

जन्मानंतर ही आपल्या आपत्यावर विविध संस्कार करणे गरजेचे--परमपूज्य भट्टारक पट्टाचार्य महास्वामी

किणी: येथील पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवात आशीर्वाचन करताना परमपूज्य भट्टारक पट्टाचार्य महास्वामी. सोबत भगवंतांच्या प्रतिमा घेऊन रथोत्सवात सहभागी झालेले शांतिनाथ पाटील आणि कुटुंबीय.
-------
जन्मानंतर अपत्यावर विविध संस्कार
गरजेचे ः पट्टाचार्य महास्वामी
घुणकी, ता. १२: गर्भ कल्याणक पूर्वार्धास गर्भावस्थेत असताना माता ज्याप्रमाणे गर्भावर संस्कार करते त्याचप्रमाणे जन्मानंतर ही अपत्यावर विविध संस्कार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन परमपूज्य भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी किणी (ता. हातकणंगले) येथे पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवात केले.
मुलनायक १००८ भगवान कुंथुनाथ व मल्लिनाथ, मानस्तंभोपरी चतुर्मुख तीर्थंकर भगवान यांना रथात घेऊन बसण्याचा मान शांतिनाथ आदगोंडा पाटील व कुटुंबीयांना, हत्तीवर शास्त्र घेऊन बसण्याचा मान दादासो जायगोंडा पाटील यांना मिळाला. सायंकाळी पट्टणकुडी (जि. बेळगाव) येथील धर्म संस्कार पाठशाळा ग्रुप यांचा श्री नेमिनाथ भगवंतांच्या जीवन चरित्रावर आधारित तीर्थंकरांचे वैराग्य कल्याण हा कार्यक्रम झाला. सकाळच्या सत्रात नवग्रह शांती कार्यक्रम सादर झाला. भगवंतांच्या गर्भ कल्याण कार्यक्रमावेळी साडेबारा कोटी मंगल वाद्यांचा जयघोष झाला. त्याचे प्रात्यक्षिक करून गर्भ कल्याणक पूर्वार्धची कार्यक्रमाची माहिती अनिल कलाजे व सहकारी यांनी दिली.
दुपारच्या सत्रामध्ये बृहतचातिक आराधना रात्री भेरी ताडन जाप्य संगीत आरती झाली. सुनील पाटील (एमडी) यांनी सूत्रसंचालन केले. पूजा समिती अध्यक्ष बाळगोंडा पाटील, संजय पाटील, अजित पाटील, महावीर पाटील, दीपक मिरजे आदी उपस्थित होते. संगीतकार विद्यासागर बडबडे यांच्या मंगलाचरण व संगीत आरती झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com