डी. वाय. पाटील बीटेक ॲग्रीचे दोन विद्यार्थी एफसीआयमध्ये.

डी. वाय. पाटील बीटेक ॲग्रीचे दोन विद्यार्थी एफसीआयमध्ये.

08590
युवराज पाटील, अक्षय पाटील

डीवायपी बीटेक ॲग्रीचे
दोन विद्यार्थी एफसीआयमध्ये
घुणकी, ता. ७ : भारतीय अन्न महामंडळामार्फत (एफसीआय) घेतलेल्या सहाय्यक श्रेणी -३ या परीक्षेत तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी युवराज पाटील व अक्षय पाटील यांनी पश्चिम विभागातून यश संपादन केले आहे. त्यांची सहाय्यक तंत्रज्ञ म्हणून निवड झाली आहे.
दोघांचेही बारावीपर्यंतचे शिक्षण बत्तीस शिराळासारख्या ग्रामीण भागात झाले असून बारावीनंतर अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात झाले. याबाबत माहिती देताना युवराज म्हणाला, ‘अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत घेण्यात येणारी ही परीक्षा चार वर्षांतून एकदाच होते. त्यामुळे खुप स्पर्धा असते. परंतू सातत्यपूर्ण अभ्यास केला तर यश मिळते.’ अक्षय म्हणाला, ‘ग्रामीण भागातील विद्यार्थी अशा परीक्षांकडे थोडेसे दुर्लक्ष करतात. चार वर्षांतून येणाऱ्या या परिक्षेत यश मिळेल की नाही याची त्यांना भीती वाटते. पण आम्ही ग्रामीण भागातून येऊन यश संपादन केले आणि या यशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मनोधैर्य उंचावेल असा विश्वास वाटतो.’
युवराज आणि अक्षय यांचे हे यश महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल असे उद्‍गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांनी काढले. यशाबद्दल माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष, आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com