Sun, October 1, 2023

गारगोटी : गारगोटी एकास अटक
गारगोटी : गारगोटी एकास अटक
Published on : 29 May 2023, 5:06 am
पोक्सोअंतर्गत एकावर गुन्हा दाखल
गारगोटी : अल्पवयीन मुलीच्या छेडछाडप्रकरणी भुदरगड पोलिसात पोक्सोअंतर्गत एकावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी शुभम दिलीप कोराणे (वय २२, कावणे, ता. करवीर) याला पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, शुभम कोराणे याने दहावीत शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा मोटारसायकलवरून पाठलाग करून माझ्याशी लग्न नाही केलेस तर ॲसिड फेकण्याची धमकी दिली. शिवाय गारगोटी,इचलकरंजी व आप्पाचीवाडी येथे जाऊन छेडछाड केल्याची फिर्याद पीडित मुलीने पोलिसात दिली आहे. याप्रकरणी शुभम कोराणे याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.