गारगोटी : बिद्री सभासद मेळावा

गारगोटी : बिद्री सभासद मेळावा

03025, 03026

मुदाळ : मेळाव्यात बोलताना ए. वाय. पाटील. समोर उपस्थित सभासद
....

''केपीं'' ना पुन्हा अध्यक्ष करणार

ए. वाय. पाटील : मुदाळला ''बिद्री'' च्या सभासदांचा मेळावा


गारगोटी, ता. ५ : ‘माजी आमदार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिद्री साखर कारखान्याची यशस्वी घोडदौड सुरू आहे. कारखान्याने राज्यात नेहमीच उच्चांकी दर दिला आहे. यामुळे सभासद आमच्या ठाम पाठीशी असून केपींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून त्यांनाच पुन्हा अध्यक्ष करणार’, असा निर्धार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व बिद्रीचे संचालक ए. वाय. पाटील यांनी केला. मुदाळ येथे भुदरगड तालुक्यातील बिद्री साखर कारखान्याच्या सभासदांसाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्ष के. पी. पाटील अध्यक्षस्थानी होते.
ए. वाय. पाटील म्हणाले, ‘अनेक वर्षे मी बिद्री कारखान्यांत केपींसमवेत काम करीत आहे. त्यांनी अडचणीतील कारखान्याला उर्जितावस्था दिली. सहवीज प्रकल्प उभारला, उच्चांकी दर दिला. त्यांचा कारभार सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ असल्याने विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत. यामुळे ते विविध मार्गांनी अडवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.’
के. पी. पाटील म्हणाले, ‘बिद्री साखर कारखान्याची निवडणूक लांबणीवर टाकून विरोधकांना काहीही मिळणार नाही. राजकीय सत्तेचा गैरवापर करून ते कारखान्याच्या प्रकल्पाला खो घालत आहेत. त्यांनी विविध मार्गांनी अडवणूक करण्यापेक्षा जाहीर निवडणूक लढवावी.’
सूतगिरणीचे अध्यक्ष पंडितराव केणे यांनी प्रास्ताविक केले. माजी उपसभापती सत्यजित जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बिद्रीचे संचालक मधुकर देसाई, धनाजी देसाई, जिल्हा बँकेचे संचालक रणजित पाटील, के. ना. पाटील, गणपतराव फराक्टे, तालुका संघाचे अध्यक्ष प्रा. बाळ देसाई, धोंडीराम वारके, सुनिल कांबळे, बापूसो आरडे, अशोक कांबळे, प्रकाश देसाई, विकास पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार यांनी आभार मानले.
...

त्यांना सगळं वाईटच दिसतं ...

के. पी. पाटील म्हणाले, ‘आमदार प्रकाश आबिटकर यांना बिद्रीतील आमच्या कारभारात सगळं वाईट दिसते. यामुळे ते सदैव खोटेनाटे आरोप करतात. मात्र त्यांना ते सिद्ध करता येत नाहीत. प्रकल्प व निवडणूक लांबविण्याचे पाप करु नका. तुमच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी मुद्देच नाहीत. यामुळे सभासद निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवतील.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com