मटका कारवाई..

मटका कारवाई..

हातकणंगलेत चार मटका अड्ड्यांवर छापे

चौघांना अटक ः नगरसेवक रणजित धनगरसह सात जण पसार

हातकणंगले ता. २ ः उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजणे यांच्या विशेष पथकाने आज हातकणंगले पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर तसेच बस स्टँड, पंचायत समिती व वडगाव रोड  या चार ठिकाणी राजरोसपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापे मारले. 

चार ठिकाणच्या कारवाईत हातकणंगले नगरपंचायतीचे नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष रणजीत बिरू धनगर  (रा. हातकणंगले),  समीर बाळू पेंढारी (रा. मुडशिंगी), शरद गायकवाड (रा. रूकडी ), जमीर मुजावर (रा. रूकडी ) या चौघा बुकी मालकांसह दिवाणजी, एजंट अशा एकूण तेरा जणांवर कारवाई केली. 

कारवाईत, पालिसांनी संतोष कृष्णा गोसावी (रा.जयसिंगपूर ), अजमीर बाबासो जमादार, आकाश कुलदीप भोसले व अमर मोहन माळवे (रा. हातकणंगले) या चौघांना अटक केली. तर चौघा बुकीमालकांसह लखन कांबळे, पवन ढवळे,  आकाश भोसले, अरबाज, वळकुंड (दोघांची पूर्ण नावे समजली नाहीत) हे पसार झाले. त्यांच्यावर हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले. कारवाईत पोलिसांनी ४९ हजारांची रोकड तसेच मोबाईल संच जप्त केले.गेल्या अनेक दिवसांपासून हातकणंगले पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठया प्रमाणांवर मटका सुरू असून, या कारवाईने हे स्पष्ट झाले आहे.

 हातकणंगले शहरामध्ये बुक्की मालक माजी उपनगराध्यक्ष रणजीत धनगर, मुडशिंगीचे समीर पेंढारी आणि रुकडीचा जमीर मुजावर हे मटका चालवत असल्याची गोपनीय माहिती जयसिंगपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजणे यांना मिळाली होती. त्यांनुसार त्यांच्या विशेष पथकाने सोमवारी दुपारी सापळे रचून हातकणंगले पोलिस ठाण्यानजीकच्या चौकात, एसटी स्टँड चौक, वडगाव रोडवरील बँकेसमोर आणि संगीता धाब्याशेजारील पान  टपऱ्यांवर छापे टाकले. यावेळी या अड्ड्यांवर चिठ्ठ्याद्वारे कल्याण मटका चालवत असल्याचे दिसून आहे. अमर माळवे, संतोष गोसावी, अजमीर जमादार,, आणि आकाश भोसले या चार संशयिताना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील मटका घेण्यासाठीचे साहित्य, मटका चिठ्ठ्या आणि ४९ हजारांची रोकड जप्त केली आहे.

हातकणंगले पोलिसांचे पितळ उघडे

पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका अड्डा सुरु असल्यास पोलिस निरिक्षकांवरच थेट कारवाई करणार असल्याचा इशारा यापूर्वी जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी दिला होता. हातकणंगले पोलिस ठाण्यासमोरच मटका घेतला जात असल्याचे सोमवारच्या कारवाईने स्पष्ट झाले. या कारवाईतून हातकणंगले पोलिसांचे पितळ उघडे पडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com