काँग्रेसतर्फे हातकणंगलेत रास्ता रोको

काँग्रेसतर्फे हातकणंगलेत रास्ता रोको

03137
हातकणंगले ः महागाईविरोधात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
----------
काँग्रेसतर्फे हातकणंगलेत रास्ता रोको
केंद्र सरकारचा निषेध; सांगली-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प
हातकणंगले, ता. ८ ः गोरगरीब, सर्वसामान्य जनतेने कष्टाने साठवलेला पैसा केंद्र सरकारच्या कचखाऊ धोरणामुळे व अदानी सर्मथनामुळे अर्थव्यवस्था डबघाईला येवून जनता देशोधडीला लागण्याची वेळ येऊन ठेपली आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. याच्या निषेधार्थ आज काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले. सांगली -कोल्हापूर रस्त्यावर रास्ता रोको करून शासनाचा निषेध केला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
पुन्हा पुन्हा गॅस दरवाढ करून जनतेला मेटाकुटीस आणण्याचे धोरण शासन राबवत आहे. प्रचंड वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे हाल होत असताना केंद्र सरकार फक्त उद्योजकांना वाचवण्यात मशगुल आहे. अन्नधान्याच्या वाढत्या किंमतीवर सरकारचे नियंत्रण नाही, देशात आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली असून देश खतरे मे अशी म्हणण्याची वेळ आली आहे, असे मत आमदार आवळे यांनी व्यक्त केले.
यावेळी अरूणकुमार जानवेकर, बाजीराव कांबळे, विजय गोरड, भगवान जाधव, किरण पोतदार, प्रताप जाधव, बाळासो दिशींगे, किरण माळी, शंकर जांभळी, सचिन चव्हाण, राहूल माने, रणजीत पाटील, अनिल घोंगडे, संजय पुजारी, उमेश गुरव, विलास कांबळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com