सतरा कोटी कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठेवा

सतरा कोटी कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठेवा

03241
हेरले : छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेच्या रौप्य महोत्सव सोहळ्याप्रसंगी माजी खासदार राजू शेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राजेश पाटील, सावकर मादनाईक, बाबासो चौगुले, अशोक माने, डॉ. सनथकुमार खोत, अशोक मुंडे आदी उपस्थित होते.
---------------
सतरा कोटी कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठेवा
राजू शेट्टी; हेरलेतील छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेचा रौप्यमहोत्सव
हातकणंगले, ता. २९ ः हेरले (ता. हातकणंगले)चे माजी सरपंच (कै.) बाळासाहेब कोळेकर यांनी स्थापन केलेली छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्था या रोपट्याचे वटवृक्षात रूपातंर संस्थेच्या उत्कृष्ट कारभारामुळे झाले आहे. सभासदांचे हितसमोर ठेवून संस्थेने सात कोटी कर्ज वाटप करून वसुल केली. संस्थेने भविष्यात १७ कोटींचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
ते हेरले (ता. हातकणंगले) येथील श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेच्या रौप्य महोत्सव सोहळ्याप्रसंगी बोलत होते. श्री. शेट्टी म्हणाले, ‘गेली चार वर्षात ऊसास तीन हजार रुपये दर मिळाला आहे. मात्र सध्या नांगरट, खते, बी बियाणे यांचे दर वाढले असल्याने एकरी १३ हजार रुपये ऊस उत्पादन खर्च वाढला आहे. तसेच एकरी ऊस उत्पादन ७ टनाने घटले असल्याने ३५ हजारांची पोकळी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे शेती उत्पादनासाठी विकास सेवा संस्थेतील कर्जांचे फिरवाफिरवीत आयुष्य गेले होते. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस पिकास दर मिळवण्यासाठी २००१ मध्ये चळवळ सुरू केली. आपल्या संघटनेच्या व्यापक चळवळीने ऊस दर मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढून विकास झाला आहे.’
डॉ. सनथकुमार खोत म्हणाले, ‘सहकार संस्था चालवताना २ टक्के फायद्यामध्ये संस्थेचे प्रशासन चालवावे लागते.’ प्राथमिक स्वरूपात सभासदांना भेटवस्तू प्रदान केल्या. संस्थेचे नुतन पदाधिकारी, संचालक, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांचा सत्कार केला. स्वागत व प्रास्ताविक संचालक स्वप्नील कोळेकर यांनी केले. जिल्हा परिषद माजी सदस्य डॉ. अशोक माने, सरपंच राहुल शेटे, प्रा. राजगोंड पाटील, चेअरमन अशोक मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले तालुका सरचिटणीस मुनिर जमादार, विजय कारंडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
माजी सभापती सावकर मादनाईक, जवाहर साखर कारखाना व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले, माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील, पंचायत समिती माजी सदस्या महेरनिगा जमादार, विलासराव नाईक, लक्ष्मण निंबाळकर, श्रीकांत सावंत, उदय चौगुले, अमर वड्ड, ॲड. प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. आभार व्हाईस चेअरमन कपिल भोसले यांनी मानले. सूत्रसंचालन सुरेश चौगुले यांनी केले.
---------
संचालक व सभासदांसह सर्वांनी स्फुरण दिल्याने १ कोटीची संस्था ७ कोटीवर गेली. सर्वांचे सहकार्य असेच सदैव राहु दे. भविष्य काळात सभासदांना काहीच कमी पडणार नाही.
-राजेश पाटील, माजी सभापती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com