Kolhapur Accident
Kolhapur Accidentesakal

Kolhapur Accident: हातकणंगलेत चारचाकी- दुचाकीची समोरासमोर धडक! अपघातात युवती जागीच ठार

चारचाकी- दुचाकीची समोरासमोर धडक; एक युवती गंभीर


हातकणंगले, ता. १५ ः भरधाव वेगाने निघालेली चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दुचाकीवरील महाविद्यालयीन युवतीचा जागीच मृत्यू झाला. दुसरी युवती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शीतल महेश माळी (वय वर्ष -१८ ) असे ठार झालेल्या युवतीचे, त सानिया संतोष भोसले (वय वर्ष -१८ दोघीही रा. कुंभोज ता. हातकणंगले) असे जखमी युवतीचे नाव आहे. हा अपघात हातकणंगले -वडगाव मार्गावर हातकणंगलेच्या हद्दीत गबाळे मळ्यासमोर झाला.
कबनुर येथील दत्ता केरबा चंदुरे (वय५६) चारचाकी (एम. एच् ०९-एबी-३८९९ घेवून) इचलकरंजीहून नरंदेकडे जनरेटर घेवून निघाले होता. येथील रघुजानकी कार्यालयासमोर ८० वर्षाच्या वृद्धाला धडक मारून भरघाव वेगाने निघून गेले.

त्यानंतर गबाळे मळ्यासमोर चारचाकी व कुंभोजकडून हातकणंगले येथे जाणाऱ्या दुचाकीची (एम एच् -०९ जी.एल.६१४८) वरून येणाऱ्या दुचाकीची समोरा-समोर धडक झाली.यात दोन्ही युवती जनरेटरच्या खाली सापडल्या. त्यातील शीतलचा जागीच मृत्यू झाला तर तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली. त्यांना तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेणले. त्यावेळी डॉक्टरांनी शीतलला मृत घोषित केले. अपघातानंतर चारचाकी चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून, पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रकाश कांबळे तपास करीत आहेत.

बारा वर्षापासून कुंभोजमध्ये वास्‍तव्‍यास
शीतलचे कुटुंब मूळचे राजस्‍थानचे असून, सराफ व्‍यवसायानिमित्त हे कुटुंब बारा वर्षापासून कुंभोज येथे वास्‍तव्‍यास आहेत. येथील माळी गल्‍लीत साई ज्‍वेलर्स नावाचे दुकान आहे. तीचे प्राथमिक व माध्‍यमिक शिक्षण कुंभोजमध्ये झाले. ‍ती आण्‍णासाहेब डांगे महाविद्यालयात एफ.वाय कला शाखेत शिकत होती. तीच्‍या पश्‍चात आई, वडील, दोन बहीणी,एक भाऊ असा परिवार आहे. आज ती मैत्रिणीबरोबर मोपेडवरून कॉलेजला चालली होती. जखमी भोसले हीचे वडील वडाप व्‍यवसाय करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com