...तरच समाजाचा सर्वांगिण विकास!

...तरच समाजाचा सर्वांगिण विकास!

02144
हुपरी : लिंगायत कुंभार समाज मेळाव्यात महेशानंद महास्वामी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी घन:शाम कुंभार, रमेश कुंभार, सुनिल कुंभार आदी उपस्थित होते.
----------
...तरच समाजाचा सर्वांगिण विकास!
महेशानंद महास्वामी; हुपरी येथे लिंगायत समाज मेळावा
हुपरी, ता.२ : एकसंध झाल्याशिवाय समाजाचे महत्व वाढत नाही. कष्ट करणाऱ्यास पाठबळ देण्याची भूमिका समाजबांधवांनी घ्यायला हवी. तरच समाजाचा सर्वांगीण विकास होईल. उपवरांनी जोडीदार निवडताना संस्कारिक व कर्तृत्ववान जोडीदार निवडण्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन भक्ती योगाश्रमाचे महेशानंद महास्वामी यांनी येथे केले.
येथील बसवेश्वर लिंगायत कुंभार समाजातर्फे आयोजीत लिंगायत समाज मेळाव्यात ते बोलत होते. लिंगायत कुंभार वधु वर परिचय मेळावाही झाला. अध्यक्षस्थानी सुनील कुंभार होते. महेशानंद महास्वामी म्हणले, ‘एकसंघतेवर समाजाचा विकास अवलंबून असतो. मुलांवर चांगले संस्कार कसे होतील याकडे आईने लक्ष देण्याची गरज आहे. समज येण्यापूर्वी मुलाच्या हातात मोबाईल दिल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.’ रामचंद्र कुंभार, बाबूराव कुंभार, घन:शाम कुंभार तसेच नंदिनी गणेश कुंभार, रोहीणी कुंभार आदींचा महेशानंद महास्वामी यांच्याहस्ते सत्कार केला.
प्रभाकर धामनीकर, प्रकाश कुंभार, नरसिंग कुंभार, महादेव कुंभार, रतन कुंभार, सुधाकर कुंभार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रमेश कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन जितेंद्र कुंभार यांनी केले. आभार दत्तात्रय कुंभार यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com