नाविण्यपूर्ण पैंजण डिझाईन स्पर्धेचे आयोजन

नाविण्यपूर्ण पैंजण डिझाईन स्पर्धेचे आयोजन

नावीन्‍यपूर्ण पैंजण डिझाईन स्पर्धेचे आयोजन
हुपरी, ता. १७ : पारंपरिक डिझाईनमध्ये अडकून पडलेल्या चांदी उद्योगाला गती देण्यासाठी येथील चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन व शिवाजी विद्यापीठातर्फे ‘नावीन्यपूर्ण पैंजण डिझाईन’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांच्या संकल्पनेतून स्पर्धा होत आहे. स्पर्धा निःशुल्क व सर्वासाठी खुली असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन खोत यांनी दिली.
श्री. खोत म्हणाले, ‘‘परिसरातील चांदी उद्योगाला गती द्यायची असेल तर नवनवीन डिझाईनचे पैंजण ग्राहकांना पुरवले पाहिजे. त्यासाठी आपण तयार केलेले डिझाईनचे पैंजण ग्राहकांना देण्याऐवजी ग्राहकांना कोणते पैंजण घालायला आवडते. हे जाणून घेण्यासाठी ग्राहकांकडूनच डिझाईन मागवून घेऊया संकल्पनेतून स्पर्धेचे आयोजन केले आहे. एका स्पर्धकाला एक किंवा अधिक डिझाईन पाठवण्याची मुभा आहे. स्पर्धेत सहभागी पहिल्या तीन नावीन्यपूर्ण डिझाईनना अनुक्रमे ११ हजार, ७ हजार व ५ हजार रुपये रोख व प्रशस्‍ति पत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.’’
स्पर्धक प्रवेशिका ऑनलाईन पाठवू शकतात अथवा शिवाजी विद्यापीठाचे समन्वयक प्रा. हर्षवर्धन पंडित चांदी फाउंडेशनचे संचालक संदीप अडसूळे यांच्याकडे ऑफलाईन जमा करू शकतात. ३१ मार्च अंतिम मुदत आहे. डिझाईनचे परीक्षण १ ते ८ एप्रिल दरम्यान होईल. विजेत्यांना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याहस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन श्री. खोत यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com