जवाहर कारखान्याच्या गळीताचा समारोप

जवाहर कारखान्याच्या गळीताचा समारोप

02237
हुपरी: कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम समारोपप्रसंगी साखर पोत्यांचे पुजन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासह मनोहर जोशी, राहुल आवाडे, संचालक आण्णासाहेब गोटखींडे, सूरज बेडगे आदिंच्या उपस्थितीत केले.
------------
जवाहर कारखान्याच्या गळीताचा समारोप
हंगामात १८ लाख टनावर उसाचे गाळप; पुढील हंगामासाठी ऊस पाठवण्याचे आवाहन
हुपरी, ता.२३ : येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा समारोप झाला. यंदाच्या हंगामात १८ लाख एक हजार ५८६ टन ऊसाचे गाळप झाले. २६ हजार ६७ हेक्टर क्षेत्र ऊसाची नोंद झाली होती. त्यापैकी १८ हजार ९८२ हेक्टर इतका ऊस गाळपासाठी आला. यंदाचा हंगाम यशस्वी झाल्या बद्दल सभासद शेतकरी, ऊस तोडणी, वाहतूकदार, मजूर व अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानून पुढील हंगामासाठीही सभासद शेतकऱ्यांनी संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवून देण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी यावेळी बोलतांना केले.
हंगामासाठी तोडणी वाहतूकीसाठी १० ट्रक, ५३८ ट्रॅक्टर व ६८० टायर गाडी, ५५१ बैलगाडी, ३५ ऊस तोडणी यंत्रे इतक्या यंत्रणेचा करार झाला होता. त्यापैकी २ ट्रक, ४०९ ट्रॅक्टर, ५७० ट्रॅक्टर टायर गाडी व ३४१ बैलगाडी, ३४ ऊस तोडणी यंत्रे प्रत्यक्ष कामावर हजर झाली. त्यामुळे वेळेत ऊस पुरवठा होण्यास मदत झाली. समारोपप्रसंगी मान्यवराच्याहस्ते साखर पोत्यांचे पूजन झाले. बाबासाहेब चौगले व त्यांच्या पत्नी सन्मती यांच्या हस्ते पुजा घालण्यात आली. कार्यकारी संचालक मनोहर जोशी, केन कमिटी अध्यक्ष, जिल्हा परिषद माजी सदस्य राहुल आवाडे, संचालक आण्णासाहेब गोटखींडे, सूरज बेडगे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com