दररोज चार ते पाच जणांवर हल्ले

दररोज चार ते पाच जणांवर हल्ले

दररोज चार ते पाच जणांवर हल्ले
इचलकरंजीत कुत्र्यांची दहशत; आयजीएममध्ये पाच महिन्यात २३७८ रुग्णांची नोंद

संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २६ ः शहरात बुधवारी सुमारे ३० जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली. इतक्या प्रमाणात एकाच दिवशी भटक्या कुत्र्यांकडून हल्ले झालेली पहिलीच घटना होती. कुत्र्यांचे हल्ले आता केवळ शहरापुरतेच मर्यादित राहिले नसून ग्रामीण भागातही वाढ होत आहे. आयजीएम रुग्णालयामध्ये जानेवारी ते २५ मेपर्यंत २ हजार ३७८ नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची नोंद आहे. यामध्ये अधिकतर इचलकरंजी शहरातील नागरिकांचा समावेश आहे. याबाबत प्रशासन कायद्याच्या नियमांकडे बोट दाखवत वेळ काढत आहे. मात्र नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत.
शहरातील आयजीएम रुग्णालयात दररोज सरसरी ४ ते ५ कुत्रे चावलेले रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या रुग्णालयामध्ये सोयीसुविधा उपलब्ध होत असल्याने नागरिकांवर उपचारास मदत होत आहे. मात्र भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या व त्यांच्याकडून होणारे हल्ले यावर ठोस मार्ग काढणे आवश्यक बनले आहे. शहरात सुमारे पाच हजारहून अधिक भटकया कुत्र्यांचा वावर आहे. ती घोळक्याने फिरत असल्यामुळे बहुतांश भागात त्यांची दहशत पहावयास मिळते. त्यांच्या हल्ल्यामध्ये अधिकतर महिला व शाळकरी मुलांचा समावेश आहे. पहाटे फिरावयास जाणाऱ्या नागरिकांनीही कुत्र्यांची धास्ती घेतली आहे.
भटक्या कुत्र्यांना मारण्यावर बंदी, जंगलात सोडण्यावर बंदी तर निर्बिजिकरण मोहीम अयशस्वी यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्यातच शहर परिसरामध्ये असलेल्या चिकन ६५, बिर्याणी गाडे यांच्या वेस्टेजमुळे कुत्र्यांमध्ये हिंस्त्रपणा वाढत आहे. प्रसशासनाकडे ठोस उपाययोजना नसल्याने हे हल्ले थांबणार तरी कधी असा प्रश्न नागरिकांमधून विचारण्यात येत आहे.
----------------
कामगार वर्ग भीतीखाली
इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्याने कामगार वर्ग अधिक आहे. हा वर्ग रात्री-अपरात्री सायकल, मोटारसायकलवरुन कामावर किंवा घरी जात असतो. अशा निर्जन वेळी भटकी कुत्री टोळीने हल्ला करतात. त्यावेळी भीतीने दुचाकीवरून नियंत्रण सुटून अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रात्रीच्या सत्रात काम करणारे कामगार भीतीखाली आहे.
----------------
निर्बिजीकरण व लसीकरण मोहिमेनंतर भटक्या कुत्र्यांचा हिंस्त्रपणा कमी होत असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र यापूर्वीही तत्कालीन पालिका प्रशासनाकडून निर्बिजीकरण मोहीम राबवली होती. मात्र ती आर्थिक उधळण ठरली. पुन्हा निर्बिजीकरण मोहीम सुरू करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मोहीम कितपत यशस्वी होईल याबाबत संभ्रम आहे.
----------------
आयजीएममधील नोंदी (ग्राफ करणे)
जानेवारी २०२३*३९८
फेब्रुवारी२०२३*४२९
मार्च २०२३*४३६
एप्रिल२०२३*४४०
मे २०२३*३५७
एकूण * २०६०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com