इचल: घरफोडी

इचल: घरफोडी

तारदाळला देवदर्शनास गेलेल्या
कुटुंबाचे चोरट्याने फोडले घर

इचलकरंजी, ता. ३० : तारदाळ (ता. हातकणंगले) येथे देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाचे चोरट्याने घर फोडले. बंद घराचे दार उचकटून दोन तोळे सोन्याचे दागिने आणि रोख ५ हजार रुपये अशा एकूण ७४ हजारांच्या मुद्देमालावर चोरट्याने डल्ला मारला. याबाबतची फिर्याद नेताजी भागवत कारंडे (वय ३१ ) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्याद नेताजी कारंडे हे आपल्या कुटुंबासह तारदाळ येथील लक्ष्मीनगर भागात राहतात. शुक्रवारी (ता. २७) घरातील सर्वजण देवदर्शनासाठी सोलापूर येथे गेले. चार दिवसांपासून सर्वजण घराबाहेर होते. ही संधी साधत चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. घरात शिरून कपाटे फोडून सोन्याचे दागिने, रोख रुपयांवर डल्ला मारला. चोरट्याने दोन तोळे वजनाच्या पिळाच्या अंगठ्या, बदाम यांसह पाच हजार रुपये लांबविले. घरफोडी झाल्याचे आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आले. एकूण ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com