इचलकरंजीत उद्या परिसंवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत उद्या परिसंवाद
इचलकरंजीत उद्या परिसंवाद

इचलकरंजीत उद्या परिसंवाद

sakal_logo
By

इचलकरंजीत उद्या परिसंवाद
इचलकरंजी : महेश सेवा समिती सभागृहात रविवारी (ता. १९) अध्यात्मिकता आणि आधुनिक विश्‍व या विषयावर परिसंवाद होणार आहे. कुटुंब प्रबोधन ही चळवळ देशभरात कुटुंब व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून कुटुंब व्यवस्था सुदृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला अध्यात्मिकतेचा शास्त्रीय विचार समजावा आणि त्यानुसार वैयक्तिक जीवनात, कुटुंबात त्यांनी सकारात्मक ऊर्जा वृद्धिंगत करावी, या उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन केले आहे. पहिल्या सत्रात जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद पै हे आत्म्याचा आध्यात्माशी असलेला संबंध विशद करणार आहेत. दुसऱ्या सत्रात लोणावळा मन:शक्ती केंद्राच्या स्वातीताई आलुरकर या आध्यात्म आणि विज्ञान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तिसऱ्‍या सत्रात कुटुंब-एक सकारात्मक ऊर्जास्त्रोत या विषयावर आत्मदर्शन शिबिराचे प्रणेता संजीव कुलकर्णी मार्गदर्शन करतील. परिसंवादाचा समारोप संपादक अरुण करमरकर यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे. परिसंवादासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.