मराठी गीत, समुहनृत्यांचा कलाविष्कार

मराठी गीत, समुहनृत्यांचा कलाविष्कार

05716
इचलकरंजी : लतांजली कार्यक्रमात छत्रपती शिवराय गीत त्रयीवरील नृत्याविष्कार सादर झाला.
-----------------
मराठी गीत, समुहनृत्यांचा कलाविष्कार
‘लतांजली’ कार्यक्रमाने रसिक मुग्ध; मराठी दिन महोत्वसाचा तिसरा दिवस
इचलकरंजी, ता.२८ : गणेश वंदनेपासून सुरु झालेला आणि अखेरच्या हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजीराजा, शतकाच्या यज्ञातून व जयदेव जयदेव जय शिवराया या गीत त्रयीपर्यंत उंचीवर पोहोचलेला ‘लतांजली’ हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा ठरला. नृत्यकलाकारांनी सादर केलेली तालबद्ध, वेधक समुहनृत्ये त्याचबरोबर सर्वच गायक कलाकार आणि वादक कलाकारांनी सादर केलेली श्रवणीय गीते आणि माहितीपूर्ण व प्रभावी निवेदन यामुळे एकूणच कार्यक्रम बहारदार झाला.
मराठी दिन महोत्सवात तिसऱ्या दिवशी हा कार्यक्रम झाला. महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि शल्यविशारद डॉ. गोविंद ढवळे यांच्या हस्ते नटराज व कुसुमाग्रज यांचे प्रतिमा पूजन झाले. सौ. हेमल सुलतानपुरे, अमोल शहा, राजन मुठाणे, प्रा. प्रशांत कांबळे, सायली होगाडे, चित्कला कुलकर्णी, महेश हिरेमठ, अतुल शहा, सुमन सुलतानपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सांगितीक प्रवासातील, विविध शैलीमधील निवडक गीते सादर करण्यात आली. विविध गीतांवर आकर्षक आणि मनोहारी समूह नृत्याविष्कार सादर करण्यात आले. गीतानुरूप वेशभूषा, मुद्राभिनय आणि आकर्षक संरचना यामुळे सर्व नृत्यांनी रसिकांची दाद मिळवली. नृत्य दिग्दर्शन सायली होगाडे यांनी केले होते.
गायक म्हणून महेश हिरेमठ, शुभांगी जोशी, शितल पोतदार व रसिका झावरे यांनी जबाबदारी पार पाडली. सुनील गुरव, भूषण साटम, राजू आवटी, सचिन देसाई व महेश कदम यांनी उत्तम साथसंगत केली. कार्यक्रमातील वेशभूषा व रंगभूषा ज्योती सांगले, सुनंदा डांगरे व सुनीता वर्मा यांनी केली होती. रंगमंच व्यवस्था संतोष आबाळे व सचिन चौधरी यांनी पाहिली. उत्कृष्ट अशी ध्वनी व्यवस्था प्रवीण व प्रशांत होगाडे यांची होती. यावेळी श्रीमंत घोरपडे नाट्यगृह भरून मोठ्या संख्येने इचलकरंजी व परिसरातील रसिक उपस्थित होते.
-----
रसिकांचा प्रतिसाद
लता मंगेशकर यांच्या जीवनातील विविध घटना आणि प्रसंगांमधून त्यांचे व्यक्तिमत्व उलगडून दाखवणारे निवेदन सौ. चित्कला कुलकर्णी व प्रा. समीर गोवंडे यांनी केले. अंतरंग, कोल्हापूर या संस्थेच्या सर्वच गायक आणि वादक कलाकरांनी कार्यक्रमातील गाणी अतिशय उत्तमरीत्या सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com