मानवकेंद्रित विकास हवा

मानवकेंद्रित विकास हवा

05733
इचलकरंजी : खंजिरे शिक्षण संस्थेमध्ये संयुक्त स्मृती उजाळा कार्यक्रमात प्रसाद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरुण खंजिरे, राहुल खंजिरे उपस्थित होते.
-------------
मानवकेंद्रित विकास हवा
प्रसाद कुलकर्णी; खंजिरे शिक्षण संस्थेमध्ये संयुक्त स्मृती उजाळा कार्यक्रम
इचलकरंजी, ता.२ : माणुसकीची ज्योत आपल्याला स्वतः पासूनच पेटवावी लागणार आहे. त्यासाठी विकास हा मानवकेंद्रित असायला हवा. सत्य, अहिंसा, प्रेम, शांती या मानवी संस्कृतीचा विकास करता आला पाहिजे. खंजिरे कुटुंबीयांनी केलेले देशसेवा मानवतेसाठी उपयोगी असून त्यांनी सहकार,राजकारण, उद्योग, शिक्षणसंस्थेतून निर्माण केलेले कार्यकर्तृत्व मानवी विकासाचे मॉडेल आहे, असे प्रतिपादन समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेमध्ये आयोजित कै. देशभक्त बाबासाहेब खंजिरे, श्रीमती सरोजिनीताई खंजिरे, कै. प्रकाशराव खंजिरे यांच्या संयुक्त स्मृती उजाळा कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अरुण खंजिरे होते. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन केले.
श्री. कुलकर्णी म्हणाले, ‘स्मृतींना उजाळा म्हणजे केवळ आठवणी काढत बसणे नव्हे. तर त्यांच्यावर निष्ठा ठेवणे, त्यांचे काम पुढे चालू ठेवणे आणि विचारांचा वारसा जतन करणे आवश्यक आहे. स्मृतींना उजाळा देताना वर्तमानातील आव्हाने समजून घेऊन सामूहिक वाटचाल करण्याची आज गरज आहे. यासाठी धर्मनिरपेक्षता, समाजवाद व मानवतेचा स्वीकार केला पाहिजे. आर्थिक समताही गरजेची असून जीवनमूल्ये जपणे फार महत्त्वाचे आहे.’
इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब मुरंदडे, सचिव शेखर पाटील यांसह खंजिरे परिवारातील सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. नाईट कॉलेज, दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, प्राथमिक विद्यामंदिर, दि न्यू इंग्लिश स्कूल, हुपरी, युनिक हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासाकेंद्रतील प्राध्यापक, शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. ए. पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय पी. आर. पाटील यांनी करून दिला. आभार एस. एम. शिंदे यांनी मानले. सूत्रसंचालन एस. ए. बिरनाळे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com