मारहाण गुन्हा

मारहाण गुन्हा

शासकीय ऑडीटरकडे कागदपत्रांची
मागणी केल्यावरून दोन कुटुंबात वाद

शिवाजीनगर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी

इचलकरंजी, ता.२६ : शासकीय ऑडीटरकडे कागदपत्रांची मागणी केल्याच्या कारणावरून दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहचला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या. त्यानुसार पोलिसांनी दोन्हीकडील पाचजणांवर अदखल पात्र गुन्हा दाखल केला.
शहरातील सिटीइन हॉटेल परिसरात आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सचिन लायकर यांनी शासकीय ऑडीटर आर. के. पाटील यांच्याकडे एका संस्थेच्या कागदपत्रांची मागणी केली. यावरून तिघांनी सचिन लायकर आणि अवधुत वणगे या दोघांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सचिन लायकर यांच्या तक्रारीनुसार रणजित लायकर, अजित लायकर, गौरव लायकर या तिघांवर (सर्व रा. इचलकरंजी) अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्याचवेळी रणजित लायकर यांना शाहुनगर पतसंस्थेत कागदपत्र मागितल्याच्या कारणावरून सचिन लायकर आणि अवधुव वणगे या दोघांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. याबाबत सचिन व अवधूत यांच्यावरही अदखलपात्र गुन्हा नोंद केला.
दरम्यान, दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तिघांनी घरात घूसून साहित्य विस्कटले आणि शिवीगाळ करीत धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर आणखी एक अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. गौरव लायकर, गंधर्व लायकर, युवराज लायकर (सर्व रा. इचलकरंजी) यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. याबाबतची तक्रार श्रीमती आशादेवी लायकर यांनी पोलिसांत दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com