डॉ. आंबवडे, डॉ. जरंडीकर यांची निवड

डॉ. आंबवडे, डॉ. जरंडीकर यांची निवड

डॉ. आंबवडे, डॉ. जरंडीकर यांची निवड
इचलकरंजी : श्री व्यंकटेश महाविद्यालयातील डॉ. एस. एच. आंबवडे व डॉ. एस. एन. जरंडीकर यांची शिवाजी विद्यापीठातील अभ्यास मंडळावर निवड झाली. त्याबद्दल महाविद्यालयामार्फत त्यांचा सत्कार केला. डॉ. आंबवडे यांची शिवाजी विद्यापीठाच्या अकाउंटन्सी विषयाच्या पदव्युत्तर अभ्यास मंडळावर कुलगुरू नियुक्त सदस्य म्हणून निवड केली. डॉ. जरंडीकर यांची शिवाजी विद्यापीठाच्या इंग्लिश अँड लिग्विस्टिंग्ज अभ्यास मंडळावर स्वीकृत सदस्य म्हणून निवड केली आहे. प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने, डॉ. आंबवडे व डॉ. जरंडीकर यांनी मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य प्रोफेसर (डॉ.) एन. एम. मुजावर आदी उपस्थित होते.
---------
प्रताप होगाडे यांचे व्याख्यान
इचलकरंजी : प्रोबस क्लबतर्फे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष वीजतज्ञ प्रताप होगाडे यांचे व्याख्यान झाले. वीज वापरासंदर्भातील बारकावे विषद केले. वीज वापर करताना सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्याबाबत असणाऱ्या कायदेशीर बाबी होगाडे यांनी स्पष्ट केल्या. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. प्रोबस क्लबचे संस्थापक अध्यक्ष धोंडीराम कस्तुरे, कमिटी चेअरमन रवींद्र सौंदत्तीकर, अध्यक्ष भीमराव मोरे, मुकुंद माळी, जावेद मोमीन, क्लबचे सचिव श्री. टारे आदी उपस्थित होते.
----
‘व्यंकटेश’मध्ये कर्मवीरांना अभिवादन
इचलकरंजी : व्यंकटेश महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी साजरी केली. प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार घातला. प्राचार्य डॉ. माने यांनी कर्मवीर पाटील यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. प्रा. डॉ. बी. एन. कांबळे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अमीन बाणदार, ग्रंथपाल एम. पी. केसरकर, प्रा. सबिया बाणदार उपस्थित होते.
-----
वसतीगृहात प्रवेशाचे आवाहन
इचलकरंजी : येथील पंचगंगा कारखान्यासमोरील महात्मा ज्योतिराव फुले मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृह गंगानगर येथे मोफत प्रवेश सुरू झाले आहेत. पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व भटक्या जमाती तसेच इतर मागास प्रवर्गा, आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मोफत आहे. वसतिगृहात मोफत निवास, भोजन, संगणक सुविधा यासह गरजोपयोगी सोयी सुविधा उपलब्ध आहेत. गरजू व पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी वसतीगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन वसतीगृहाचे अधीक्षक आर. बी. बनसोडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com