अवैध धंदे कारवाई

अवैध धंदे कारवाई

इचलकरंजीत अवैध धंद्यांवर कारवाई

बेकायदेशीर दारू, मटका,जुगार क्लबवर छापे

इचलकरंजी, ता. १७ : शहापूर, गावभाग व शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध आठ ठिकाणी बेकायदेशीर दारू, मटका व जुगार क्लबवर छापा टाकून पोलिसांनी ११ जणांवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहापूर पोलिसांनी तारदाळ (ता.हातकणंगले) येथील पानपट्टीसमोर उघड्यावर मटका घेणाऱ्या‍ कागलच्या दोघांना अटक केली. सुरज कृष्णात पाटील आणि कृष्णात तुकाराम पाटील अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख १ हजार ४०० रुपये आणि मोबाईल असा १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच योगाश्रम रोडवरील ज्योती टेलर्सच्या बाजूस उघड्यावर बेकायदेशीरपणे देशी आणि हातभट्टी दारु विक्रीवर कारवाई केली. चंद्रभागा वसंत नगरकर (वय ६०) या महिलेकडून दारूच्या ३३ बाटल्या तसेच ६० लिटर गावठी हातभट्टी असा सुमारे साडेचार हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
गावभाग पोलिसांनी बिग बझारसमोरील रोडवर बेकायदेशीरपणे विदेशी मद्य वाहतूक करताना तरुणाला अटक केली. रोहित बाळू तडाखे ( वय २६, नेहरुनगर झोपडपट्टी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून दारूच्या साठ्यासह चारचाकी वाहन असा ३ लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे. महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यानुसार मरगुबाई मंदिराजवळ मटका घेणाऱ्या युवराज संभाजी पाटील (वय ३५, रा. कबनूर) याला अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून १५५० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी पाटील याच्यासह विजय साबण्णावर आणि सुरज पांडव अशा तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी कल्याण मटका घेताना दत्तात्रय बाबूराव शिंदे व अजय चाफेकर अशा दोघांच्या विरोधात कारवाई केली. लंगोटे मळ्यातील दत्त मंदिरासमोर झालेल्या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून ६०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. जवाहरनगर भागातील कुंभार गल्ली कल्याण मटका घेणाऱ्या‍ पांडूरंग दत्तात्रय दबडे याला अटक केली. त्याच्याकडून रोख १४५० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी अड्डा मालक प्रमोद सुर्यवंशी याच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कुडचे गल्लीत मटक्याची चिठ्ठी घेणाऱ्या‍ उदय पाटील यास अटक केली. त्याच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल असा ७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी नागेश पेटकर याच्यासह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. तसेच जवाहरनगरमध्येच कल्याण मटका घेणाऱ्या‍ संतोष फातले याला अटक केली. त्याच्याकडून रोख ७०० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी सोमनाथ लोणे याच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com