पाणी जपण्याची जबाबदारी सर्वांचीच

पाणी जपण्याची जबाबदारी सर्वांचीच

लोगो ः मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमाला
-------------
06348
इचलकरंजी : मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेच्या अखेरच्या दिवशी अमृतवाहिनी नदी या विषयावर डॉ. राजेंद्रसिंह राणा यांचे व्याख्यान झाले.
------
पाणी जपण्याची जबाबदारी सर्वांचीच
डॉ. राजेंद्रसिंह राणा; इचलकरंजीत ‘अमृतवाहिनी नदी’ वर व्याख्यान
इचलकरंजी, ता.२४ : केवळ पैशाची बँक महत्त्वाची नाही तर पाण्याची बँकही महत्त्वाची आहे. पाणीच नसेल तर शेती, व्यापार, उद्योग काहीच करता येणार नाही. त्यामुळे पाणी ही आपली संपत्ती आहे, ती आपण जपायला हवी आणि ती जबाबदारी कुणा एकाची नाही तर आपली सर्वांची आहे,असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले.
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलतर्फे आयोजित व्याख्यानमालेत अखेरच्या दिवशी ‘अमृतवाहिनी नदी’ या विषयावर ते बोलत होते. रोटरीचे सहायक प्रांतपाल पन्नालाल डाळ्या, दीपक निंगुडगेकर - कुलकर्णी आदींच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन केले. इतिहास काळापासून आपल्याकडे सुरू असलेल्या जलव्यवस्थेचा आढावा घेताना ते म्हणाले, ‘आज भारतातील साधारणपणे ६७ टक्के नद्या प्रदूषित झाल्या आहेत तर उर्वरित कोरड्या पडत आहेत. आपण नदीला आई म्हणतो पण तिची देखभाल आणि काळजी याकडे मात्र दूर्लक्ष करतो. अनेक पक्षांची सरकारे येऊनही यामध्ये काहीही बदल झालेला नाही. पूर्वी नदीचे पाणी आपण ओंजळीत घेऊन पिऊ शकत होतो पण आज तसे करू शकत नाही.’
नदी प्रदूषण आणि उपाय याबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘नदी वाचवण्यासाठी नदी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नदीचा आजार शोधणे, ती केव्हा कोरडी पडते, केव्हा पूर येतो, कशाप्रकारे प्रदूषित होते या सर्वांचा अभ्यास आपण करायला हवा. नदी वाचवणे ही जबाबदारी कुण्या एका घटकाची नसून ती आपली सर्वांची, सरकारची आणि समाजाची संयुक्त जबाबदारी आहे. शहरे, गावे, रासायनिक शेती, त्याचबरोबर वस्त्रोद्योग, साखर उद्योग आदी उद्योगांमुळे नदी प्रदूषण होते.’
अशोक जैन, लक्ष्मीकांत मर्दा, समीर गोवंडे उपस्थित होते. संजय होगाडे व संदीप चोडणकर यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय ओम पाटणे यांनी करून दिला. सूत्रसंचालन संतोष आबाळे यांनी केले. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या व्याख्यानास शहर व परिसरातील रसिक आणि पर्यावरण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----
नदीजोड प्रकल्प अशक्य
स्वातंत्र्यानंतरच्या काळात पूरग्रस्त, अवर्षणग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भाग वाढत आहे. अशा कोणत्याही गोष्टींमुळे होणारे विस्थापन धोकादायक आहे याचाही विचार आपण करायला हवा. आपल्या देशातंर्गत पाणी विवाद खूप आहेत. त्यामुळे पाण्यासाठी कदाचित तिसरे महायुद्ध होऊ शकेल, असा धोकाही येणाऱ्या काळात आहे. तसेच नदी जोड प्रकल्प आकर्षक वाटत असला तरी याचा अभ्यास केल्यानंतर हा प्रकल्प सर्वच दृष्टीने प्रचंड खर्चीक आणि अव्यवहारीक आहे हे लक्षात येते. त्यामुळे भारत देशात नदीजोड प्रकल्पही अशक्य असल्याचे डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com