औद्योगिकरणाकडे करिअर म्हणून पहा

औद्योगिकरणाकडे करिअर म्हणून पहा

06363
इचलकरंजी : श्री व्यंकटेश महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला.
-----------
औद्योगिकरणाकडे करिअर म्हणून पहा
उद्योजक नितीन धूत; व्यंकटेश महाविद्यालयात पारितोषिक वितरण
इचलकरंजी, ता. २६ : नवीन शैक्षणिक धोरणातील झालेले बदल स्वीकारून व्यंकटेश महाविद्यालयाने केलेली प्रगती उल्लेखनीय आहे. शहराच्या गरजेनुसार सुरू केलेल्या कोर्सेसमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लागत आहे. शहराच्या वाढत्या औद्योगीकरणाकडे विद्यार्थ्यांनी करिअर म्हणून पहावे आणि विविध उद्योगांची पायाभरणी करून शहराच्या विकासामध्ये सहभागी व्हावे, असे प्रतिपादन उद्योजक नितीन धूत यांनी केले.
व्यंकटेश महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. दुसरे प्रमुख पाहुणे तेजराज सोळंकी यांनीही मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून महाविद्यालयाच्या यशाचा आढावा घेतला. संस्थेचे चेअरमन कृष्णा बोहरा, विकास चंगेडिया यांची विशेष उपस्थिती होती.
महाविद्यालयातील विद्यापीठ गुणवत्ता यादीतील विद्यार्थी, सांस्कृतिक कार्यक्रमातील यशस्वी विद्यार्थी, गुणवंत खेळाडू, गुणवंत विद्यार्थी तसेच राज्य व देश पातळीवरील विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून सन्मानित केले. ग्रंथालयामार्फत राबवलेल्या ‘पुस्तक परीक्षण’ स्पर्धेचे बक्षीस वितरणही केले. उपप्राचार्य प्रो. (डॉ) एन. एम. मुजावर यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख ए. आय. बाणदार यांनी आयोजन केले. आभार प्रा. डॉ. एस. एन. जरंडीकर यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com