विज्ञाननिष्ठ शिक्षक सुनील पाटील

विज्ञाननिष्ठ शिक्षक सुनील पाटील

06365
सुनील पाटील

विज्ञाननिष्ठ शिक्षक सुनील पाटील

देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इचलकरंजीमध्ये सुनील पाटील हे १९९२ पासून सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झाले. २०१८ पासून मुख्याध्यापक होते. ३१ वर्षाच्या सेवेतून मुख्याध्यापक म्हणून ते ३० मे रोजी निवृत्त होत आहेत.
रांगोळी (ता. हातकणंगले) येथील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण प्राथमिक विद्यामंदिर रांगोळी, माध्यमिक शिक्षण हुपरी येथील रयत शिक्षण संस्थेत झाले. ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरी करत महाविद्यालयीन शिक्षण स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या इचलकरंजीतील डीकेएएससी कॉलेजमधून पूर्ण केले. संजय फौंड्रीत सुपरवायझर म्हणून काम करत असताना डीकेटीई येथे बी.एड.चे शिक्षण पूर्ण करून खंजिरे शिक्षण संस्थेत विज्ञान शिक्षक म्हणून रुजू झाले.
अध्यापन मनोरंजक व सहज विद्यार्थ्यांना समजावे यासाठी त्यांनी शहरात सर्वप्रथम प्रात्यक्षिक व ई लर्निंग तंत्रज्ञान अमलात आणले. शासकीय विज्ञान प्रदर्शनात राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत अनेक पारितोषिके शाळेला मिळवून दिली. खेळासाठी शाळेत अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. यामुळे अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत पदकांना गवसणी घातली. कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन केल्याने या युनीटचे अनेक विद्यार्थी आज ॲनिमेशन क्षेत्रात कार्यरत आहेत.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये निवेदक, व्याख्याता यासह समाजप्रबोधनाचे त्यांचे कार्य अविरत सुरूच आहे. या कार्याची दखल घेऊनच त्यांना लायन्स क्लब, राष्ट्रसेवा दलाकडून ''गुणवंत आदर्श शिक्षक'' पुरस्काराने सन्मानित केले आहे. ते निवृत्त होण्याचे दुःख होत असले तरी त्यांच्या कारकिर्दीचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
- दादासो तराळ,
सहाय्यक शिक्षक, दि न्यू हायस्कूल इचलकरंजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com