‘आप’ची स्वराज्य यात्रा बुधवारी इचलकरंजीमध्ये

‘आप’ची स्वराज्य यात्रा बुधवारी इचलकरंजीमध्ये

‘आप’ची स्वराज्य यात्रा
बुधवारी इचलकरंजीमध्ये
इचलकरंजी, ता. २९ : भाजप सरकारच्या दडपशाहीविरोधात आवाज उठवत महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील सुराज्य आणण्यासाठी आम आदमी पार्टीने स्वराज्य यात्रा काढली आहे. तिची सुरुवात पंढरपुरातून झाली आहे. ती बुधवारी (ता. ३१) पक्षाचे राष्ट्रीय सहसचिव गोपाल इटालीया यांच्या प्रमुख उपस्थितीत इचलकरंजीत येणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष प्रकाश सुतार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
६ जुनला रायगड येथे समारोप होणार आहे. बुधवारी ही यात्रा यसिंपूरमार्गे इचलकरंजीत येणार आहे. दुपारी साडेतीन वाजता यात्रेचे सांगली रोडमार्गे इचलकरंजीत स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य मार्गावरुन ढोल-ताशांच्या गजरात राजर्षी शाहु पुतळ्याजवळ या यात्रेची सांगता होणार आहे. सायंकाळी सात वाजता कोल्हापूरातील मिरजकर तिकटी येथे राष्ट्रीय सहसचिव इटालीया यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष निलेश रेडकर यांनी दिली. वसंत कोरवी, यशंवत भंडारे, बाबुराव कारंडे, संजय सुर्यवंशी, दिनेश कोळी, आनंदा सकटे, अनिता बडे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com