ऊस वजन काटा

ऊस वजन काटा

06432

शिरोळ ः वजन काट्याच्या पायाभरणीप्रसंगी ‘आंदोलन अंकुश’ चे कार्यकर्ते.
...

डिजिटल वजन काट्यामुळे
शेतकऱ्यांची फसवणूक थांबेल

धनाजी चुडमुंगेः ‘आंदोलन अंकुश’ च्या वतीने काटा उभारणीला प्रारंभ

शिरोळ, ता. ५ः ‘आंदोलन अंकुश’ च्या वतीने उसाच्या वजनातील काटामारी रोखण्याकरीता शिरोळ- नृसिंहवाडी रस्‍त्यावर लोकवर्गणीतून शेतकरी वजन काटा उभारला जात आहे. लोकवर्गणीतून उभारण्यात येणारा राज्यातील हा पहिला वजन काटा असल्याची माहिती ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिली.
शिरोळ- नृसिंहवाडी रस्‍त्यावर असलेल्या रामचंद्र गेंडे पुजारी यांच्या जागेत पायाभरणीचा कार्यक्रम टाकळी येथील ज्येष्ठ माजी सैनिक शेतकरी अशोक पाटील आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चुडमुंगे म्हणाले, ‘वजनकाट्याचे काम जलद गतीने पूर्ण करून येत्या गळीत हंगामाच्या सुरुवातीला काटा चालू करण्याचा प्रयत्न राहील. वजन काटा उभारणीसाठी शेतकऱ्यांनी तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी. या काट्यावर शेतकऱ्यांना ऊस वजनासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. तसेच परिसरातील सर्व साखर कारखान्यांवर या वजन काट्यामुळे वचक बसून ऊस वजनात होणारी फसवणूक थांबून शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.’
यावेळी ‘आंदोलन अंकुश’ संघटनेचे सर्व पदाधिकारी व शेतकरी सहकुटुंब उपस्थित होते.
---

डिजिटल पद्धतीचा वजन काटा

‘आंदोलन अंकुश’ कडून उभारण्यात येणारा हा काटा डिजिटल पद्धतीचा असणार आहे. राज्यात सर्वच साखर कारखान्यांचे काटे हे ऍनॉलॉक पद्धतीचे आहेत. या काट्यामध्ये वजनात फेरफार करण्यास वाव असतो. नवीन तंत्रज्ञान व प्रगत सॉफ्टवेअरचा वापर असलेला डिजिटल वजन काटा उभारण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com