आत्मनिर्भर बेटी अभियानाचा समारोप

आत्मनिर्भर बेटी अभियानाचा समारोप

06435
इचलकरंजी : आत्मनिर्भर बेटी अभियान शिबिर समारंभात सहभागी मुलींना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.
--------
आत्मनिर्भर बेटी अभियानाचा समारोप
इचलकरंजीत रोटरी, माय फौंडेशनतर्फे आयोजन
इचलकरंजी, ता.६ : रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व माय फौंडेशन आयोजित सलग ४५ दिवस सुरू असणाऱ्या माय आत्मनिर्भर बेटी अभियानाचा समारोप झाला.
शिबिराचे यंदा चौथे वर्ष असून या अभियानामध्ये मार्शल आटर्स, व्याख्यान, सोशल मीडिया जागृती, रनिंग, ट्रेकिंग, सायकलिंग, टीमवर्क विकसित करणे, अभिनय कला, वक्तृत्व स्पर्धा यांचा समावेश होता.
समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस.पी. मर्दा तर रोटरीचे अध्यक्ष सत्यनारायण धूत, सचिव प्रकाश गौड, माय फौंडेशनचे उपाध्यक्ष श्यामसुंदरजी मर्दा, डॉ. लक्ष्मीकांत तोष्णीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. माय फौंडेशनने सुरु केलेल्या उपक्रमाचे महत्व खूप असून भविष्यात मुलींसाठी अविरत कार्य करणारी संस्था म्हणून माय फौंडेशन व रोटरी क्लबचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. भविष्यात पालकांनी अशा शिबिरात जास्तीत जास्त मुलींना पाठवावे, असे आवाहन डॉ. मर्दा यांनी केले.
मुलींनी लघु नाट्य, मार्शल आर्ट्सचे विविध प्रकार सादर केले. शिबिरात घेतलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी मुलींना पारितोषिके दिली. सहभागी मुलींना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह दिले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी गोपाल चांडक, संजय रांदड, नवनीत बांगड, बालाप्रसाद भुतडा, अजित चितलांगिया, दीपक बियाणी आदिंनी मेहनत घेतली. स्वागत सत्यनारायण धूत यांनी केले. प्रास्ताविक अरुण बांगड यांनी केले. सूत्रसंचालन दीपक राठी यांनी केले. आभार वासुदेव तोतला यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com