मटका कारवाई

मटका कारवाई

जयसिंगपूर, दानोळीत मटका अड्ड्यावर छापा
जयसिंगपूर : शहरातील नवव्या व सातव्या गल्लीत मटका घेणाऱ्यांवर जयसिंगपूर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी कारवाई केली. याप्रकरणी भानुसाद रामचंद्र कोळी (वय ५० रा. राजीव गांधीनगर जयसिंगपूर), महादेव शंकराप्पा तलवार (वय ४७ रा.जयसिंगपूर) व दोन्ही ठिकाणचे मटकामालक जवाहर ऊर्फ बाबासाहेब जिनगोंडा पाटील (रा.कुरुंदवाड ता.शिरोळ) याच्यावर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून दोन्ही ठिकाणांहून १७ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल रोहित डावाळे, अमोल अवघडे यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे, तर दानोळी येथे केलेल्या कारवाईत जयसिंग मारुती माने व रामदास तातोबा बुधावले दोघे (रा. दानोळी) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून १२ हजार ६१५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल वैभव सूर्यवंशी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com