नांदणीत बालसाहित्य संमेलन

नांदणीत बालसाहित्य संमेलन

05015
नांदणी : ग्रंथदिंडीत कै. शहा तुळजाराम नागरदास कन्या विद्या मंदिराच्या विद्यार्थीनी सहभागी झाल्या.
---------
नांदणीत बालसाहित्य संमेलन
पंचगंगा प्रदूषण मुक्तीचे फलक घेऊन विद्यार्थी दिंडीत सहभागी
जयसिंगपूर, ता. ९ : नांदणी (ता. शिरोळ) येथील कै. शहा तुळजाराम नागरदास कन्या विद्या मंदिरमध्ये अकरावे बालसाहित्य संमेलन उत्साहात झाले.
सकाळी ग्रंथदिंडीने सुरुवात झाली. नांदणी हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनींनी लेझीम व झांज पथक दिंडीत सहभागी झाले. पंचगंगा प्रदूषण मुक्तीचे फलक घेऊन विद्यार्थी ग्रंथ दिंडीत सामील झाले. वेगवेगळ्या वेशभूषेत मुलींनी सहभाग घेतला. श्रावणी मिरजे हिने स्वागत केले. प्रमुख पाहुणे लेखिका मेघा उळागड्डे यांनी मुलींना कविता, कथा लेखन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. आपल्या गोष्टीतून व कथेतून संस्काराचा परिणाम कसा होतो याविषयी मार्गदर्शन केले. व्याख्याते सुजाता कोळी यांनी बालसंस्कार कसे होतात, संस्काराचे महत्त्व याबद्दल माहिती दिली. व्यवस्थापन समिती सदस्या भारती म्हेत्रे यांनी शाळेत चालणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे मुलींमध्ये होणाऱ्या चांगल्या बदलांची माहिती दिली. शाळेने संकलन केलेले भरड धान्याची माहिती, पाककृतीवरील पुस्तकाचे व मुलींनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन केले. तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर कराटे, बुद्धीबळ, अडथळा शर्यत, वक्तृव, फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या मुलींचा सत्कार केला. दुपारच्या सत्रात मुलींनी स्व लेखन केलेल्या कविता, गोष्टी, विनोद सादर केले. नाटिका, एकपात्री, स्वगत सादर केले. स्वागताध्यक्ष यांनी पालकांचे, मुलींचे व मान्यवरांचे आभार मानले. मुख्याध्यापक अविनाश कोडोले यांच्यासह शिक्षकांनी यासाठी परिश्रम घेतले.
-------
‘फास्ट फूड’वर परिसंवाद
शेवटच्या सत्रात फास्ट फूड हवे की नको यावर परिसंवाद झाला. आम्ही भरड धान्यापासून बनवलेले पदार्थ जास्त खाऊ व पालकांनी असे पदार्थ चांगले तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com