जैव वैद्यकीय कचरा संकलन दर निश्चित करा

जैव वैद्यकीय कचरा संकलन दर निश्चित करा

05116
मुंबई: जैव वैद्यकीय कचरा संकलनाचा दर निश्चित करण्याच्या मागणीचे निवेदन पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांना राजू शेट्टी यांनी दिले.

जैव वैद्यकीय कचरा संकलन दर निश्चित करा
माजी खासदार राजू शेट्टी यांची पर्यावरण सचिव दराडेंकडे मागणी
जयसिंगपूर, ता.२७ : दवाखान्यामध्ये दैनंदिन तयार होत असलेला जैव वैद्यकीय कचरा एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी जैव वैद्यकीय कचरा विघटन कंपन्यांना जिल्ह्यातील तालुके नेमून दिले आहेत. या कंपन्यांकडून सेवाशुल्क आकारणी करून त्या तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील दवाखान्यामधील कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबधित कंपनीची आहे. मात्र या कंपन्या जादा सेवाशुल्क आकारणी करून मक्तेदारी निर्माण करू लागले आहेत. यामुळे या कंपन्यावर नियंत्रण आणून त्याचे दर निश्चिती करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांच्याकडे केली.
बैठकीनंतर प्रधान सचिव प्रविण दराडे यांनी तत्काळ राज्यातील सर्वच भागामध्ये सेवाशुल्क आकारणी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील समितीस अधिकार असून संबधित समितीने तातडीने बैठका घेऊन दर व सेवा देण्यासंदर्भातील सुचना दिल्या. ज्या कंपन्या सेवाशुल्क जादा आकारून वेळेत कचरा न उचलणा-या कंपन्यावर कारवाई करण्यासंदर्भातही निर्देश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com