नाभिक महामंडळ पदाधिकारी निवड

नाभिक महामंडळ पदाधिकारी निवड

नाभिक महामंडळ पदाधिकारी निवड
जयसिंगपूर, ता.९: शिरोळ तालुका नाभिक महामंडळाची नूतन कार्यकारणी निवड संत सेना मंदिर नांदणी (ता. शिरोळ) येथे झाली.
शिरोळ तालुका नाभिक महामंडळाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत गंगधर, कार्याध्यक्षपदी अनिल क्षीरसागर, सेक्रेटरीपदी धनाजी काटकर यांची निवड करण्यात आली. इतर सर्व विभागीय उपाध्यक्ष व सदस्यांची निवडी केल्या. तालुकास्तरावर प्रथमच शिरोळ तालुका नाभिक महिला महामंडळाची स्थापना केली. अध्यक्षपदी दिपाली क्षीरसागर यांची निवड केली. उपाध्यक्षपदी ज्योती काटकर, तर सचिवपदी प्रेरणा साळुंखे यांची निवड केली. इतर सर्व महिला सदस्यांच्या निवडी केल्या. कोल्हापूर जिल्हा नाभिक महामंडळाच्या कार्यकारी चिटणीसपदी नांदणीचे दीपक पोवार यांची तर अमोल बनकर (कनवाड) यांची कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड केली.
स्वागत व प्रास्ताविक जिल्हा कार्यकारी चिटणीस दत्तात्रय यादव यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल काशीद यांनी केले. शिरोळ तालुका नाभिक महामंडळाचे माजी अध्यक्ष तुळशीदास माने, सुनील इंगळे, मनोहर संकपाळ, रामचंद्र शिंदे, दिनकर चव्हाण, निवडीसाठी राज्य नाभिक महामंडळ सचिव सयाजी झुंजार, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब काशीद, मारुती टिप्पुगडे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष व महिला जिल्हाध्यक्ष सौ. मेघाताई जाधव यांनी मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com