आष्टा शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

आष्टा शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

05235
आष्टा: ''सौजन्य वारी आली आपल्या दारी'' सामाजिक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्रा. अजय कोंगे, श्रीमती मंगल पाटील, मनिषा मोटकट्टे आदिंनी केले.
----------
आष्टा शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
जयसिंगपूर, ता. १५: अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या ''सौजन्य वारी आली आपल्या दारी'' या सामाजिक उपक्रमांतर्गत आष्टा जिल्हा परिषद शाळा क्रमांक नऊ (जि. सांगली) प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असण्याऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप केले.
शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मंगल पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मनिषा मोटकट्टे, व्यवस्थापन समितीचे सदस्य राजाराम देसावळे, मॉडेल स्कुल कमिटी सदस्य साजिद आयुबखान इनामदार, वरिष्ठ मुख्याध्यापिका फरिदा मकानदार, सहशिक्षक दयानंद लोखंडे, समीर नायकवडी, उपशिक्षका निलम साळुंखे, श्रीमती शाहीन मुजावर, आशिष कुलकर्णी आदी उपस्थित होते. समन्वयक, प्रा. अजय कोंगे यांनी कार्यक्रमाविषयी तसेच विद्यापीठातंर्गत विविध उपक्रमांची माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com