बाजार समितीसाठी ९२.१६ टक्के मतदान

बाजार समितीसाठी ९२.१६ टक्के मतदान

05316
जयसिंगपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सेवा सोसायटी गटाच्या मतदान केंद्रावर झालेली गर्दी.
-----
बाजार समितीसाठी ९२.१६ टक्के मतदान
कुरुंदवाडला दोन्ही आघाडीकडून मतदार खेचण्यासाठी चढाओढ
जयसिंगपूर, ता.३०: जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी उत्साही वातावरणात मतदान प्रक्रिया झाली. सोसायटी गटातून १९१० पैकी १७४१ तर ग्रामपंचायत गटामध्ये एकूण ६६८ पैकी ६३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ९२.१६ टक्के मतदान झाले.
जयसिंगपूर सोसायटी गट मतदान क्र.१ मध्ये ५१९ पैकी ४७२ तर ग्रामपंचायत गट मतदान क्र.२ मध्ये २५४ पैकी २४१ तर शिरोळ सोसायटी गट मतदान क्र.३ मध्ये ५७५ पैकी ५३३ तर ग्रामपंचायत गट मतदान क्र.४ मध्ये १७६ पैकी १६४ तसेच कुरूंदवाड सोसायटी गट मतदान क्र.५ मध्ये ३९५ पैकी ३४४, मतदान क्र.६ मध्ये ४२१ पैकी ३९२ तर ग्रामपंचायत गट मतदान क्र. ७ मध्ये २३८ पैकी २३० मतदान झाले.
येथील नगरपालिका शाळा क्रमांक एकमध्ये रविवारी सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी जयसिंगपूर केंद्रावर उदगाव, चिपरी, कोथळी, दानोळी, नांदणी, यड्राव यासह १९ गावातील सेवा सोसायटीचे संचालक व ग्रामपंचायतीचे सदस्य मतदानाला एकत्रित चारचाकी वाहनातून येत होते. तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी मतदान केंद्राचे पाहणी केली. त्याचबरोबर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, स्वाभिमानीचे सावकार मादनाईक, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, भाजपचे राजवर्धन नाईक-निंबाळकर यांच्यासह लोकप्रतिनिधींनी जयसिंगपूर केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
शिरोळ येथे पद्माराजे विद्यालयातील मतदान केंद्रावर चुरशीने शांततेत मतदान झाले. येथील मतदान केंद्र क्रमांक ३ व ४ वर कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकरी संस्था तसेच ग्रामपंचायत मतदार संघातील अर्जुनवाड, आलास, कवठेगुलंद, गणेशवाडी, नृसिंहवाडी, शिरोळ यासह १६ गावातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव आदिंनी मतदानाचा हक्क बजावला. कुरूंदवाड येथे ९२.२० टक्के मतदान झाले. दोन्ही आघाडीकडून सोसायटी व ग्रामपंचायतीचे मतदार खेचण्यासाठी चढाओढ सुरू होती. निवडणुकीसाठी चुरस निर्माण झाली होती. येथील साने गुरुजी विद्यालय येथे संस्था सोसायटी मतदारांसाठी दोन केंद्रे तर ग्रामपंचायती मतदानासाठी एका केंद्रावर केंद्रावर मतदान झाले. कुरूंदवाड येथील २१ गावातील मतदान प्रक्रिया झाली. संस्था सोसायटी गटाच्या ५ क्रमांक केंद्रावर ३९५ पैकी ३४४ तर ६ क्रमांक केंद्रावर ४२१ पैकी ३९२ तर ग्रामपंचायत गटाच्या ७ क्रमांकाच्या केंद्रावर २३८ पैकी २३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com