तृतीयपंथीयाला पोलीस कोठडी

तृतीयपंथीयाला पोलीस कोठडी

चोरीप्रकरणी संशयितास पोलिस कोठडी
जयसिंगपूर, ता.१९: वास्तुदोष काढून उतारा टाकण्यास देऊन दागिने आणि रोकड असा ३ लाख ९६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या संशयिताला ताब्यात घेण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी संशयित रेश्मा उर्फ महंमदहनीफ हुसेनसाहब शेख या तृतीयपंथीयाची येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता.२२) पोलिस कोठडीत रवानगी केली. निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे १५ मे रोजी रात्री साडेआठ वाजता हा प्रकार घडला होता. याप्रकरणी मिरासो मकबूल बागसार (वय ४९, रा. आंबेडकर चौक, बागसार गल्ली, निमशिरगाव) यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली होती. घटनेनंतर संशयित पसार झाला होता. जयसिंगपूर पोलिसांनी या संशयिताला ताब्यात घेऊन शुक्रवारी प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com