सभापतीपदी सुभाषसिंग रजपूत बिनविरोध

सभापतीपदी सुभाषसिंग रजपूत बिनविरोध

सभापतीपदी सुभाषसिंग रजपूत बिनविरोध
जयसिंगपूर बाजार समिती; मुजलिल पठाण उपसभापती
शिरोळ ता.२३: जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुभाषसिंग रजपूत यांची तर उपसभापतीपदी मुजमिल पठाण यांची बिनविरोध निवड झाली.
जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय जनता पार्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी सर्वपक्षीय नेतेमंडळीची, राजर्षी शाहू विकास पॅनलने एकतर्फी विजय मिळवला होता. स्वामिमानीचे सावकार मादनाईक यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी, श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, शिरोळ तालुका भाजपा नेते अनिलराव यादव, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे समर्थक व ज्येष्ठ संचालक सुभाष रजपूत यांची सभापतीपदी व उपसभापती पदी काँग्रेसचे गणपतराव पाटील यांचे समर्थक समर्थक मुजमिल पठाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
दुपारी एक वाजता बाजार समितीच्या कार्यालयात सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाची विशेष सभा झाली. यात सभापती पदासाठी सुभाषसिंग रजपूत आणि उपसभापती पदासाठी मुजमिल पठाण यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रेमदास राठोड यांनी घोषित केले.
नूतन सभापती सुभाषसिंग रजपूत यांनी मनोगत व्यक्त केले. दत्त साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील, शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे, यड्राव बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर आदींनी रजपूत आणि पठाण यांचा सत्कार केला. बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण, रामदास गावडे, महावीर पाटील, सुरेश माणगावे, दर्याप्पा सुतार, चंद्रकांत जोग, संजय अनुसे, अण्णासो पाणदारे, सिद्राम कांबळे, किरण गुरव, प्रवीणकुमार बलदवा, दादासो ऐनापुरे आदी उपस्थित होते.
----------
सुकाणू समितीची स्थापना
बाजार समितीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संचालकांकडून कारभार करून घेण्यासाठी सुकाणू समितीची स्थापना केली आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक, भारतीय जनता युवा मोर्चाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील यांची सुकाणू समितीत निवड केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com