अपहरण करून मारहाण

अपहरण करून मारहाण

05490
...
नांदणीतील युवकाचे
अपहरण करुन बेदम मारहाण

गंभीर अवस्थेत बेडकिहाळ येथे रस्त्याकडेला टाकले

जयसिंगपूर, ता.२३: नांदणी (ता. शिरोळ) येथील तीर्थराज भरतकुमार उपाध्ये (वय ३२) यांना बेदम मारहाण करत अज्ञात तीन ते चार जणांनी अपहरण केल्याची घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली. त्यानंतर उपाध्ये यांना चारचाकी गाडीतून उदगांव बायपासमार्गे बेडकिहाळ (ता. निपाणी, जि.बेळगाव) येथे नेण्यात आले. गंभीररित्या मारहाण करून त्याठिकाणी रस्त्याकडेला फेकण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी(ता.२२) रात्री तीर्थराज उपाध्ये हे कोल्हापूरहून पावणेआठच्या सुमारास कामावरून जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवर आले होते. येथून मोटारसायकल घेण्याकरिता येत असताना अज्ञात तीन-चार व्यक्तींनी उपाध्ये यांना पकडून गाडीमध्ये घालून अपहरण केले. त्यानंतर याबाबतची फिर्याद अभिनंदन उपाध्ये यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली. जयसिंगपूर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शोध मोहीम सुरू केली. यावेळी मोबाईल लोकेशनवरून उपाध्ये यांचे लोकेशन बेडकिहाळ येथे दिसून आले. पोलिस पथक मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास बेडकिहाळ येथे पोहचले असता उपाध्ये यांना गंभीररित्या मारहाण करून रस्त्याच्या कडेला टाकल्याचे दिसून आले. उपाध्ये यांना तत्काळ इचलकरंजी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, संशयित आरोपींचा शोध अद्याप लागलेला नाही. तसेच अपहरण का केले, याचे नेमके कारण गुलदस्त्यात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com