संशयताच्या घरावर दगडफेक

संशयताच्या घरावर दगडफेक

संशयित आरोपीच्या घरावर दगडफेक

जयसिंगपूर : चिपरी (ता. शिरोळ) येथे महिलेवरील अत्याचार प्रकरणातील संशयिताच्या घरावर अज्ञातांनी शुक्रवारी दगडफेक केली. जयसिंगपूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने अनर्थ टळला. हल्लेखोर पोलिस येण्यापूर्वीच पळून गेले. महिलेवरील अत्याचारप्रकरणी पोलिस कोठडीत असणाऱ्या संशयिताच्याघरावर काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना सकाळी घडली. दगडफेक करणारे घटनास्थळावरून पळून गेल्यामुळे कोणालाही ताब्यात घेता आले नाही. दरम्यान, संशयित आरोपीला कुणीही पाठीशी घालू नये व त्याला कडक शासन व्हावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com