कळे: ऑस्ट्रेलियाच्या सामाजिक कार्यकर्त्या मिना गुली यांच्या रन ब्लू मोहिमेला सावर्डेत प्रभातफेरी काढून पाठिंबा

कळे: ऑस्ट्रेलियाच्या सामाजिक कार्यकर्त्या मिना गुली यांच्या रन ब्लू मोहिमेला सावर्डेत प्रभातफेरी काढून पाठिंबा

03072
रन ब्ल्यू मोहिमेला सावर्डेत पाठिंबा
कळे : तीन लाख मैल व्यापलेले हे वनक्षेत्र जंगलतोड वणवे आणि तापमान वाढीमुळे संपत आहे. २०२१ मध्ये यापैकी ५ हजार ११० मैल वनक्षेत्र नामशेष झाले आहे. जगाच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम करणारी ही बाब आहे, असे प्रतिपादन भाजपा पन्हाळा तालुका प्रतिनिधी प्रतापसिंह काळे यांनी केले. ऑस्ट्रेलियाच्या सामाजिक कार्यकर्त्या मिना गुली यांच्या रन ब्ल्यू मोहिमेसंदर्भात सावर्डे (ता.पन्हाळा) प्राथमिक शाळेत ते बोलत होते. वयाच्या दहाव्या वर्षी गुली यांना दुष्काळाशी सामना करावा लागला. पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी त्या जगभरात ‘रन ब्ल्यू’ मोहिमेअंतर्गत मॅरेथॉन करीत आहेत. ४५ वर्षांनंतर पाणी विषयावर न्यूयॉर्कला परिषद झाली. त्यानिमित्त मिना गुली यांनी परिषदेत पाणी संवर्धनाबद्दल मत व्यक्त केले, अशी माहिती श्री.काळे यांनी दिली. ग्रामपंचायत सदस्या शिल्पा बच्चे अध्यक्षस्थानी होत्या. विद्युत सहाय्यक अतुल पाटील, शाळेचे शिक्षक कर्मचारी, महिला, विद्यार्थी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com