कॉम्रेड नामदेवराव गावडे हे कार्य कर्तृत्वाने अमर - चंद्रदीप नरके

कॉम्रेड नामदेवराव गावडे हे कार्य कर्तृत्वाने अमर - चंद्रदीप नरके

02177
कष्टकऱ्यांसाठी गावडेंनी
आयुष्य खर्ची घातले
चंद्रदीप नरके; पहिल्या स्मृतिदिनी स्मरणिका प्रकाशन
कसबा बीड; ता. २३ ः दिवंगत कॉम्रेड नामदेवराव गावडे यांनी कारकिर्दीत कामगार, शेतकरी व कष्टकऱ्यांना न्याय मिळण्यााठी शासनदरबारी आयुष्य खर्ची घातले. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने ते सदैव स्मरणात राहतील, असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
कॉम्रेड नामदेवराव गावडे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त स्मरणिका प्रकाशन सोहळा बीडशेड येथील महालक्ष्मी हॉलमध्ये झाला. यावेळी श्री. नरके बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे (अहमदनगर) होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संपतराव पवार प्रमुख उपस्थित होते.
गावडे यांच्या प्रतिमेस फुले वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्यभरातून आलेले पुरोगामी व डाव्या चळवळीतील नेते, राज्य किसान सभेचे सचिव राजन क्षीरसागर (परभणी), औरंगाबादचे राम बाहेती, बीड जिल्ह्याचे नामदेव चव्हाण, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे यांनी गावडे यांच्या आठवणी जाग्या केल्या. यावेळी स्मृती जागर समितीमार्फत कॉम्रेड दिलीप पवार, राम कळंबेकर, सुमन पाटील, दिनकर सूर्यवंशी, बी.एल. बर्गे, शांताबाई जाधव, बाळू पाटील, नामदेव पाटील, भिकाजी कुंभार, सुनंदा खाडे, शिवाजी तळेकर आदी कार्यकर्त्यांचा सन्मान झाला. कसबा बीडचे लोकनियुक्त सरपंच व कुंभी कारखान्याचे संचालक उत्तमराव वरूटे, दादासाहेब लाड, यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, मार्केट कमिटी चे माजी उपाध्यक्ष शामराव सूर्यवंशी, आनंदराव देसाई, मुकुंद पाटील, मधुकर मांगोरे आदींसह मान्यवर व पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सम्राट मोरे व दिनकर सूर्यवंशी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com