‘शासन आपल्या दारी’चा लाभ घ्या

‘शासन आपल्या दारी’चा लाभ घ्या

03448
कबनूर ः शासन आपल्या दारी कार्यक्रमात अप्पर तहसीलदार शरद पाटील यांनी मार्गदर्शन केले. पी. एम. पाटील, मिलिंद कोले, अशोक पाटील आदी उपस्थित होते.
---------
‘शासन आपल्या दारी’चा लाभ घ्या
शरद पाटील; कबनूर, कोरोचीतील नागरिकांसाठी शिबीर
कबनूर, ता. २५ ः सर्वसामान्य व्यक्तींना समाधान योजनेअंतर्गत शासकीय कामे आपल्या गावात होण्यासाठी शासनाने ''शासन आपल्या दारी'' आयोजित केले आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अप्पर तहसीलदार शरद पाटील यांनी केले.
कबनूर येथील पंचरत्न सांस्कृतिक हॉलमध्ये महाराजस्व योजना अभियान अंतर्गत कबनूर व कोरोचीतील नागरिकांसाठी आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील, ज्येष्ठनेते बी. डी. पाटील, दशरथ पिष्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील, कोरोचीचे सरपंच डॉ. संतोष भोरे यांनी मनोगत व्यक्त केले. कबनूरचे उपसरपंच सुनील काडाप्पा, आजरा बँकेचे संचालक अशोक पाटील, शांतिनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष मिलिंद कोले आदी उपस्थित होते. माजी सरपंच सुधीर पाटील यांनी स्वागत केले. पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. सरपंच शोभा पोवार यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com