कबनूरमध्ये रस्ता डांबरीकरण प्रारंभ

कबनूरमध्ये रस्ता डांबरीकरण प्रारंभ

03487
कबनूर ः येथील परीट गल्ली येथील रस्ता डांबरीकरण कामाचा प्रारंभ करताना डॉ. राहुल आवाडे. शेजारी मान्यवर.
-----
कबनूरमध्ये रस्ता डांबरीकरण प्रारंभ
कबनूर ः कबनूरच्या विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी आणून गावचा सर्वांगीण विकास करू."अशी ग्वाही माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी दिली. आमदार प्रकाश आवाडे यांच्या फंडातून व जिल्हा परिषद माजी सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून वार्ड क्रमांक दोनमधील परीट गल्ली येथे मंजूर झालेल्या विकास निधीतून करण्यात येत असलेल्या डांबरीकरण रस्त्याच्या उद्‍घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. राहूल आवाडे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून रस्ता डांबरीकरण कामाचा प्रारंभ केला. सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुनील काडाप्पा, माजी सरपंच मधुकर मणेरे, निलेश पाटील, बबन केटकाळे, रजनी गुरव, सुधीर लिगाडे, वैशाली कदम आदी उपस्थित होते. प्रा. रवींद्र पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com