Thur, Sept 21, 2023

श्रद्धा ज्युनिअर कॉलेजचा शंभर टक्के निकाल
श्रद्धा ज्युनिअर कॉलेजचा शंभर टक्के निकाल
Published on : 30 May 2023, 11:17 am
श्रद्धा ज्युनिअर कॉलेजचा १०० टक्के निकाल
कबनूर ः इचलकरंजीमधील श्रद्धा ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्सचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला. गुणानुक्रमे विद्यार्थिनी किंजल करवा (९६.५०), भूमिका मुंदडा (९५.६७), तन्वी पारख (९५ टक्के). ९२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. १५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी व १ विद्यार्थ्याने द्वितीय श्रेणी प्राप्त केली. अकौंटन्सी विषयात पाच विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले. त्याचप्रमाणे गणित विषयात तीन विद्यार्थी तर माहिती तंत्रज्ञान विषयात नऊ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून यश संपादन केले. विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष ए. आर. तांबे यांच्याहस्ते केला.