कसबा सांगाव: दूधगंगा पाणीपुरवठा संस्थेची निवडणूक बिनविरोध

कसबा सांगाव: दूधगंगा पाणीपुरवठा संस्थेची निवडणूक बिनविरोध

सांगावच्या दूधगंगा पाणीपुरवठा
संस्थेची निवडणूक बिनविरोध

कसबा सांगावः येथील श्री दूधगंगा सहकारी पाणीपुरवठा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. सन २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक सालाकरिता ही निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. बंडगर यांनी काम पाहिले. ४०० एकरचे लाभक्षेत्र असलेली आणि स्वयंचलित ठिबक सिंचन द्वारे पाणीपुरवठा करणारी जिल्ह्यातील ही एकमेव संस्था आहे. सद्यस्थितीत संस्था कर्जमुक्त आहे. नूतन संचालकांनी सभासदांना वेळेवर मुबलक व माफक दरात पाणी देण्याचा संकल्प बोलून दाखविला. त्याचप्रमाणे संस्थेची अद्ययावत कार्यालय इमारत बांधण्याचा मानस व्यक्त केला. नूतन संचालक पुढीलप्रमाणे: अजित चौगुले, मारुती पाटील, जीवंधर गगाई, शौकत मुल्ला, धनपाल लबाजे, आनंदा पाटील, वर्धमान चौगुले, रंगराव ढोकरे, रावसो पाटील, माणिक चौगुले, रुक्मिणी पाटील, संतोष चिखलवाळे.
...
...

नागाव विकास संस्थेसाठी शनिवारी मतदान

नागाव : येथील नागाव विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्थेच्या सन २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी ( ता. २५) मतदान होणार आहे. संस्थेच्या सतरा पैकी सोळा जागांसाठी ३१ उमेदवार निवडून रिंगणात आहेत. संस्थेचे सुमारे सातशे चाळीस सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वारणा साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुभाष पाटील व महावीर पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पाटील पॅनेल व संयुक्त विकास आघाडीचे अनुसूचित जाती प्रवर्गातील रामचंद्र आप्पा यादव यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर महिला प्रवर्गातील दोन जागांसाठी विरोधी स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीने एकच उमेदवार दिला असल्याने सत्ताधारी पाटील पॅनेलला आणखी एका उमेदवाराचा विजय निश्चित आहे. सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रवर्गातून एकूण बारा जागा आहेत. या गटात सत्ताधारी पाटील पॅनेलमधून सुभाष पाटील, महावीर पाटील, सर्जेराव चौगुले, राजेंद्र गुडाळे, गणपतराव पोवार, राजेश भोसले, राजेंद्र मगदूम, राजेंद्र माणगावे, रावसो लंबे, दिलीप शिराळे, सुभाष सावंत व अतुल सोळांकुरे यांच्या विरोधात विरोधी स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीकडून माजी सरपंच अशोक ऐतवडे, भिमराव खाडे, शिवाजी चौगुले, संभाजी जाधव, गंगाराम नागावकर, जिवंधर पाटील, राहुल पाटील, प्रकाश पोवार, गणपती माळी, आशानंद मिठारी, आण्णा लंबे, अशोक सोळांकुरे हे निवडणूक लढवत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com