सायकल चोरट्याला शिक्षकांनी केले जेरबंद

सायकल चोरट्याला शिक्षकांनी केले जेरबंद

कुडित्रे ः श्रीराम हायस्कूल येथून सायकली लांबविणाऱ्या चोरट्याला शिक्षकांनी शिताफीने जेरबंद केले. या वेळी शिक्षक
एस. एम. नाळे, डी. एस. राऊत, विकास परीट, शिवाजी पाटील-कोपार्डेकर, एस. डी. कांबळे आदी.
03266
...

शिक्षकांनी केले सायकल चोरट्याला जेरबंद
कुडित्रे, ता. २८ ः करवीर तालुक्यातील श्रीराम हायस्कूलमधून गेल्या १५ दिवसांत तीन विद्यार्थ्यांच्या सायकली चोरी झाल्या. सायकल चोरी झाल्याने विद्यार्थी आणि पालकांत चिंतेचे वातावरण होते. आजही चोरट्याने प्राथमिक शाळेतील एका विद्यार्थ्याची सायकल लांबवली. मात्र, शिक्षकांच्या सतर्कतेमुळे या चोरट्याला पकडण्यात यश आले.
याबाबत शिक्षकांनी सांगितले, की दुपारीच आम्हाला एका भंगार डेपोवरून चोरीची सायकल मिळाली व तेथेच चोराचे नावही समजले. शाळा सुटल्यावर शिक्षक एस. एम. नाळे बाहेर पडल्यावर त्यांना ‘त्या’ चोराने गाडी थांबविण्यासाठी हात केला व दारूसाठी १०० रुपयांची मागणी केली. सरांनी त्याला गाडीवर बसवून घेतले व थेट शाळेतच आणले. शाळेत त्याला खाक्या दाखविल्यावर त्याने सायकली कोठे विकल्या, ते सांगायला सुरुवात केली. त्याला गाडीत घालून प्रत्यक्ष सायकली विकलेल्या ठिकाणी नेले व त्या सायकली परत मिळविल्या.
एखाद्या पोलिस यंत्रणेप्रमाणे शिक्षकांनी मोहीम पार पाडली. या मोहिमेत एस. एम. नाळे, डी. एस. राऊत, विकास परीट, शिवाजी पाटील-कोपार्डेकर, एस. डी. कांबळे सहभागी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com