डेंगीचे रुग्ण

डेंगीचे रुग्ण

उपवडे पैकी आरडेवाडीत डेंगीचे रुग्ण

ग्रामपंचायत, आरोग्य विभागाकडून औषध फवारणी

सांगरुळ ता.१९ ः उपवडे पैकी आरडेवाडी (ता. करवीर) येथे डेंगीचे रुग्ण आढळून आले. आरोग्य विभागाकडून पाहणी करण्यात आली असता आठ रुग्णांपैकी तीन रुग्णांना नुकतीच लागण झाल्याचे निष्पन्न झाले. एक रुग्णाला डेंगी झाला होता. यामुळे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने गावात औषध फवारणी व पाणी तपासणी करण्यात आली आहे.
उपवडे पैकी आरडेवाडी येथे सुमारे ९०० लोकसंख्येची वस्ती आहे. गावात एकच मुख्य गल्ली आहे. या गल्लीत सहा डेंगीसदृश तापाचे रुग्ण होते.अन्य गल्लीत दोन रुग्ण असे आठ संशयित रुग्ण होते. गावात डोंगरातून झऱ्याचे पिण्यासाठी पाणी सोडले जाते.गावामध्ये दलदल, पाणी साचण्याचे प्रमाण नसतानाही डेंगीचे रुग्ण आढळले आहेत.
ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्यानंतर सांगरुळ प्राथमिक उपकेंद्र अंतर्गत दोन वेळा सर्वे करून तपासणी करण्यात आली. यावेळी ८ पैकी तीन रुग्णांना नुकतीच डेंगीची लागण झाली होती. आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य सेवक शिवाजी चव्हाण, रवी कोळी, पृथ्वी खोत, महेश काटकर यांनी गावात डास आळीची पडताळणी केली.
सरपंच पांडुरंग पोवार म्हणाले, ‘ग्रामपंचायतच्या वतीने औषध फवारणी केली आहे, पाणी तपासणी केली आहे. ग्रामस्थांनी पाणी उकळून प्यावे अशा सूचना दिल्या आहेत.’
सांगरुळ आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम जाधव, म्हणाले,‘ गावात सोमवारी पुन्हा सर्वे करण्यात येणार आहे. संशयित रुग्णांना औषध उपचार केला आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com