कागल : विकास आराखड्यात शेतकऱ्यांच्यावर अन्याय - शेतकऱ्यांचे अजितदादा पवार यांना निवेदन

कागल : विकास आराखड्यात शेतकऱ्यांच्यावर अन्याय - शेतकऱ्यांचे अजितदादा पवार यांना निवेदन

04807

विकास आराखड्यात
शेतकऱ्यांवर अन्याय

शेतकऱ्यांचे अजित पवार यांना निवेदन

कागल, ता. २५ : नगरपरिषदेने शहराचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. विकास आराखड्यात शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यांना न्याय द्यावा, अशा आशयाचे निवेदन विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिले. यावेळी आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, आरक्षित जमिनीवर कर्ज मिळत नाही. जमीन विकता येणार नाही. अनेकजण यापूर्वी दूधगंगा प्रकल्प, कालवा, आर.टी.ओ, पाणीपुरवठा योजना, हायवे या प्रकल्पांसाठी जमीन देवून अल्पभूधारक झाले आहेत. प्रस्तावित आराखड्यात २४, १८, १२, ९ मीटरचे रस्ते प्रस्तावित आहेत. प्रस्तावित रस्ते जलस्त्रोतातून (विहीर/बोअर) जातात. काहीजणांचे साखळी रस्ते असताना नव्याने १८ व १२ मीटरचे रस्ते आरक्षित केले आहेत. आरक्षित जमिनी बारमाही पिकाऊ आहेत. विकास आराखड्यामुळे शेतीक्षेत्र कमी होईल.
यापूर्वीच्या आराखड्यातील ४७ पैकी २२ आरक्षणे ३७ वर्षात अविकसित राहिली. यामुळे नगरपरिषदेने १० वर्षांत जमीन अधिग्रहण केली नाही तर आरक्षण उठवण्यासाठी शेतकऱ्यांना ससेहोलपट करावी लागेल.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, महेश मगदूम, महेश घाटगे, सम्राट सणगर, मिलींद पालकर, बबन शेळके, बाळासाहेब मोरे, दादासो पसारे, अनिल जाधव, शिवाजी घाटगे, दिनकर घाटगे, सुनील पसारे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com