कागल : राजे बँकेची ७ कोटी १३ लाखाचा ढोबळ नफा

कागल : राजे बँकेची ७ कोटी १३ लाखाचा ढोबळ नफा

राजे बँकेला ७ कोटींवर ढोबळ नफा
कागल, ता. २१ : शतकमहोत्सवी राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँकेला २०२२-२३ आर्थिक वर्षात ७ कोटी १३ लाख ढोबळ नफा झाला. एनपीए शून्य टक्के राहिला, अशी माहिती अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, ‘स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांचे आशीर्वाद व समरजितसिंह घाटगे यांच्यामार्गदर्शनाखाली बँकेची घोडदौड सुरू आहे. यावर्षी ठेवीत २७ कोटींची वाढ होवून ठेवी ४६४ कोटी झाल्या. १६३ कोटींचे कर्ज वाटप होवून ३१ मार्चअखेर येणे कर्जे २६६ कोटी आहेत. एकूण व्यवसाय ७३० कोटी झाला. राजे बँकेची १००० कोटी व्यवसायाकडे वाटचाल सुरु आहे. गुंतवणुकीत १२ कोटींची वाढ होवून एकूण गुंतवणूक २१४ कोटी झाली.
ते म्हणाले, ‘बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेंतर्गत युवकांना उद्योगाकरिता १० लाखांपर्यंत ५ वर्ष मुदतीचे कर्ज दिले. या कर्जाची नियमित परतफेड केल्यास महामंडळाकडून १२ टक्के व्याज परतावा कर्जदारांचे खातेवर जमा केला जातो. ३१ मार्चअखेर जिल्हयातील सर्वाधिक १०५६ युवकांना ९० कोटींपेक्षा अधिक कर्जवाटप केले. कर्जामध्ये ठेवीच्या प्रमाणाचा विचार करता राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. मराठा समाजाव्यतिरीक्त इतर समाजातील युवकांसाठी उद्योगधंद्यासाठी सवलतीत ‘राजर्षी छ. शाहू महाराज व्यवसाय वृध्दी कर्ज योजना’ सुरू केली. या योजनेतून ३६ युवकांना १ कोटीपेक्षा अधिक कर्जपुरवठा केला.
यावेळी उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, संचालक राजेंद्र जाधव, आप्पासो हुच्चे, आप्पासाहेब भोसले, प्रकाश पाटील, रविंद्र घोरपडे, रणजित पाटील, उमेश सावंत, कल्पना घाटगे, सीए अनिल मोरे, अॅड. बाबासाहेब मगदुम, मुख्यकार्यकारी अधिकारी विनायक चव्हाण व व्यवस्थापक प्रशासन हरीदास भोसले उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com